• Home
  • International
  • Pollution lockdown : 70 thousand people life saved in 100 day in china because of pollution decreases

प्रदूषण घटल्याने चीनमध्ये १०० दिवसांत ७० हजार लोकांचे वाचले प्राण, युरोप व आशियाची हवा श्वास घेण्यायोग्य

नासाने सॅटेलाइट चित्राने दाखवला प्रदूषणाचा फरक नासाने सॅटेलाइट चित्राने दाखवला प्रदूषणाचा फरक
१० वर्षांत प्रथमच मुंबईचे आकाश दिसले निरभ्र १० वर्षांत प्रथमच मुंबईचे आकाश दिसले निरभ्र

  • प्रदूषणावर लॉकडाऊन : चीन-अमेरिकेचे आकाश झाले निरभ्र
  • १० वर्षांत प्रथमच मुंबईचे आकाश दिसले निरभ्र

वृत्तसंस्था

Mar 22,2020 10:16:00 AM IST

वॉशिंग्टन - जगातील १८३ देश सध्या कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत, परंतु शास्त्रज्ञांनी याची होणारी इष्टापत्ती शोधून काढली आहे. प्रदूषण कमी होण्याने चीनमध्ये नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण खूूप कमी झाले आहे. आकाश स्वच्छ दिसत आहे. इटलीतील व्हेनिसच्या नद्यांचे पाणीही स्वच्छ झाले आहे. अमेरिकेतही प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले.

चीनमध्ये कच्चे तेल, कोळशाचा वापर ३६%, तर प्रदूषणात २५% घट

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी चीनमध्ये औद्योगिक कामकाज तात्पुरते थांबवले आहे. एक महिन्यात चीनमध्ये कच्चे तेल व कोळशाचा वापर ३६%नी घटला आहे. तसेच चीनमध्ये फेब्रुवारी महिन्यात कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन २० कोटी टन कमी झाले आहे. ते गेल्या वर्षीच्या तुलनेत २५% कमी आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे प्रा. मार्शल बर्क यांनी सांगितले, चीनमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढले होते, परंतु गेले १०० दिवस लॉकडाऊन केल्याने सुमारे ५० ते ७५ हजार लोकांचे प्राण वाचले.

अमेरिकेत वाहतूक घटली, कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन १०%कमी

कोरोना व्हायरसचा फैलाव झाल्याने अमेरिकेतील अनेक शहरांत औद्याेगिक कामकाज थंडावले आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या एका संशोधनानुसार एकट्या न्यूूयाॅर्क शहरात वाहतूक २५ टक्क्यांनी घटली आहे. कार्बन मोनोऑक्साइड ५०% व कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन १० टक्क्यांनी घटले आहे. आशिया, उत्तर अमेरिका व युरोप मिळून जगातील ८८% कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन येथूनच होते. आवरवर्ल्ड इन डेटाच्या अहवालानुसार, चीन व अमेरिका मिळून जगातील ४२ % कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित करतात.

नासाने सॅटेलाइट चित्राने दाखवला प्रदूषणाचा फरक

नुकतेच युरोपियन स्पेस एजन्सी व नासाने सॅटेलाइट इमेजद्वारे जगातील प्रमुख शहरातील वातावरणात ग्रीन हाऊसच्या घातक वायूंचे उत्सर्जन दाखवले होते. जानेवारी महिन्यात उत्तर इटलीत नायट्रोजन डायऑक्साइडचा स्तर खूप जास्त होता. मार्च महिन्यात तो गायब झाला.

१० वर्षांत प्रथमच मुंबईचे आकाश दिसले निरभ्र

आपल्या देशातही प्रदूषणाचा स्तर कमी झाला आहे. कोरोनाची सुरक्षा पाहता बहुतांश लोक घरातच थांबले आहेत. कर्मचारी घरात राहून काम करत आहेत. त्यात मुंबईत आभाळ व हवा निरभ्र राहिली. लाेकांनी सोशल मीडियावर म्हटले, दहा वर्षांत प्रथममच आभाळ स्वच्छ पाहण्यास मिळाले.

X
नासाने सॅटेलाइट चित्राने दाखवला प्रदूषणाचा फरकनासाने सॅटेलाइट चित्राने दाखवला प्रदूषणाचा फरक
१० वर्षांत प्रथमच मुंबईचे आकाश दिसले निरभ्र१० वर्षांत प्रथमच मुंबईचे आकाश दिसले निरभ्र