आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरात सांस्कृतिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे. विवाहित जोडपी अपत्ये टाळू लागली आहेत. त्याऐवजी श्वान-मांजरी पाळण्यास प्राधान्य दिले जात आहे. पाळीव प्राण्यांना सांभाळून असे लोक स्वत:ला पालक समजू लागले आहेत. वास्तविक हा स्वार्थीपणा आहे, असे ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी म्हटले आहे. व्हॅटिकनमधील संबोधनात पोप फ्रान्सिस म्हणाले, पाळीव प्राण्यांना सांभाळून स्वत:ला पालक समजून हे लोक भ्रमात जगू लागले आहेत. परंतु या ट्रेंडमुळे जगभरातील जन्मदरात घट होऊ लागली आहे. माता-पित्याची भावना नसल्यामुळे मानवतेपासूनही दूर जात आहेत. आजकाल काही जोडपी एकही अपत्य होऊ देत नाहीत किंवा काही एका अपत्यावर थांबतात. परंतु अशा लोकांकडे मात्र दोन-दोन श्वान किंवा मांजरी पाळल्याचे दिसते.
पाळीव प्राणी पाळल्यानंतर तुम्ही त्यांच्याशी भावनिक नाते तयार करता. परंतु आई-वडील आणि पोटची मुले यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्यापासून असे लोक दूरच राहतात. इटलीतील जन्मदर घटत असल्याकडे पाेप यांनी लक्ष वेधले. मातृत्व नसलेला आणि पितृत्वही न जगणारा समुदाय आता वृद्धत्वाकडे झुकू लागला आहे. पोटी मुलेच नसतील तर निवृत्तिवेतनावरील कर कोण भरेल बरे? असा प्रश्नही पोप यांनी उपस्थित केला. वृद्ध होणाऱ्या लोकांची देखभाल, ख्यालीखुशाली कोण बघेल? अपत्य नसलेल्यांचा वृद्धापकाळ वाईट जाईल, असे पोप यांनी म्हटले आहे. पोप यांच्या या विधानावर काही प्राणी हक्क संघटनांनी विरोध दर्शवला. पाळीव प्राण्यांचे जीवनही अनमोल असते, असे संघटनांचे म्हणणे आहे. खरे तर सर्वांच्या जगण्याला महत्त्व द्यावे.
अशा कुटुंबांमुळे मानवतेवर संकट
पोप म्हणाले, अपत्य होऊ न देणाऱ्या कुटुंबांमुळे मानवतेवर संकट आहे. त्यामुळे सामान्यांमधील मानवी मूल्य संपून जाईल. सरकारने मुले दत्तक घेण्याची प्रक्रिया सुलभ केली पाहिजे. कागदी घोडे नाचवले जाऊ नयेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.