आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईस्टर:पोपचा व्हॅटिकनच्या मोठ्या चर्चमध्ये 35 जणांच्या उपस्थितीत ‘आशेचा संदेश’

व्हॅटिकन सिटीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • गेल्या वर्षी 70 हजार लोक होते सेंट पीटर्स बासिलिकात उपस्थित

जगातील १३० कोटी कॅथॉलिक ख्रिश्चन बांधवांनी रविवारी घरात ईस्टर साजरा केला. कोरोना विषाणूच्या साथरोगामुळे यावेळी चर्चमध्ये गेलेले नव्हते. ईस्टरच्या निमित्ताने ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकन सिटीच्या सर्वात मोठे चर्च सेंट पीटर्स बासिलिकामध्ये प्रार्थना केली. गेल्या वर्षी ईस्टरला येथे ७० हजार लोकांची उपस्थिती होती. यावेळी फक्त ३० ते ३५ लोक हजर होते. कोरोनावर जागतिक एेक्याचा संदेश देताना पोपनी सांगितले, ईस्टर अंधकारात आशेचा संदेश देतो. जगाने कोरोनाच्या भीतीमुळे झुकण्याची गरज नाही. सर्व ख्रिश्चन बांधव घरातच प्रार्थना करत आहेत. ही प्रार्थना लोकांनी यूट्यूबवर लाइव्ह पाहिली. 

२१ हजार चौरसफुटात बासिलिका चर्च : सेंट पीटर्स बासिलिका चर्च व्हॅटिकन सिटीमध्ये सर्वात मोठे चर्च असून ते २१ हजार चौरस मीटरमध्ये बांधलेले आहे. कोरोना विषाणूमुळे येथे लोक आलेले नाहीत. यामुळे चर्चची भव्यता वेगळीच दिसली. पोप दरवर्षी येथूनच प्रार्थना करतात. 

प्राचीन काळापासूनची परंपरा पोपकडून खंडित

ईस्टरच्या निमित्ताने प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा पाेप यांनी खंडित केली. या वेळी त्यांनी लोकांसमोर भाषण देण्याएेवजी लाइव्ह स्ट्रीमिंग व ऑनलाइन प्लॅटफाॅर्मवर दिले. पोप फ्रान्सिस यांनी एकट्याने प्रार्थना करण्याची ही पहिलीच वेळ होती. 

हल्लेखोरांना श्रीलंकेची माफी

श्रीलंकेच्या चर्चने गेल्या वर्षी ईस्टरच्या दिवशी सकाळी हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना माफी दिली आहे. चर्चचे कार्डिनल मॅल्कम रंजिथ यांनी रविवारी सकाळी टीव्ही स्टुडिओद्वारे प्रसारित ईस्टरच्या प्रार्थनेवेळी म्हटले, ज्या शत्रूंनी आम्हाला उद््ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, त्यांना आम्ही माफ करतो. २१ एप्रिल २०१९ रोजी हल्लेखोरांनी ३ चर्च व तीन हॉटेल्समध्ये बाॅम्बस्फोट केले. यात २७९ लोक ठार झाले

बातम्या आणखी आहेत...