आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिणाम:जपानमध्ये लोकसंख्येत घट झाल्याचा परिणाम शाळांच्या विद्यार्थी संख्येवर, अनेक शाळांना टाळे

टोकियो | ज्युलियन रयाल16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपानमध्ये १९७० च्या दशकापासून लोकसंख्येत घट होत आहे. टोकियोच्या ३४ वर्षीय अयाको म्हणाल्या, मला विवाह करण्याची इच्छा नाही. जपानमध्ये विशीतील महिला-पुरुष बाहेर जाणे, लोकांमध्ये मिसळणे पसंत करत नाहीत. श्रम कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार २०२१ मध्ये ८११६०४ मुलांचा जन्म झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ३० हजारांनी कमी आहे. गेल्या सहा वर्षांत प्रजनन दरात १.४४ ने घट होऊन ती १.३० वर पोहोचली आहे.

लॉकडाऊनमध्ये ही समस्या आणखीन गंभीर झाली आहे. त्याचा परिणाम आता सरकारी व खासगी शाळांतून दिसतो. जपानमध्ये गेल्या एका दशकात विद्यार्थी संख्येत सुमारे १० लाखांहून जास्त घट झाली आहे. सरकारी पाहणीनुसार १ हजार ८९२ नगरपालिकांपैकी ३४६ मध्ये विद्यार्थी संख्या १० वर्षांत ३० टक्क्यांनी घटली आहे. देशातील प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या केवळ तीन हजार एवढी राहिली आहे. वास्तविक देशात ही संख्या २९ हजार ७९३ एवढी होती. त्यातही ग्रामीण भागातील शाळा वेगाने बंद पडल्या. आेकुमा, फुकुशिमा प्रांतात सर्वात जास्त समस्या दिसून आली. तेथे दहा वर्षांत विद्यार्थ्यांचे प्रमाण ९९ टक्के कमी झाले. आण्विक हल्ल्यामुळे फुकुशिमा स्थलांतरितांच्या बाबतीत क्रमांक एकवर आहे. त्या भागात २०११ मोठ्या प्रमाणात भूकंप, सुनामी धडकली होती.

२०२१ मध्ये केवळ ५ लाख १४ हजार विवाह
जपानमध्ये ३० वर्षीय २५.४ टक्के महिला, २६.५ टक्के पुरुष आहेत. त्यापैकी १९ टक्के पुरुष व १४ टक्के महिला विवाह करू इच्छित नाहीत. २०२१ मध्ये जपानमध्ये ५ लाख १४ हजार विवाह झाले. १९४५ च्या दुसऱ्या महायुद्धानंतरची ही सर्वात कमी विवाह संख्या ठरली आहे. १९७० मध्ये १० लाखांवर विवाह झाले होते.

बातम्या आणखी आहेत...