आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्न स्टार प्रकरण:विरोधकांची ट्रम्पना साथ, लोकप्रियता वाढली, कायदेशीर प्रक्रियेने मोहिमेला धार

अमेरिका2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी गुप्तचर एजंटांच्या गराड्यात लोअर मॅनहटन कोर्टहाऊसमध्ये पोहोचल्यावर त्यांनाअटक करण्यात आली. ३४ आरोपांची निश्चिती होऊन त्यांवर युक्तिवाद झाला होता. मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नी एल्विन ब्रॅग यांनी ट्रम्प यांच्यावर त्यांचे माजी वकील मायकल कोहेन यांच्यामार्फत पोर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल हिला दिलेल्या १.३ दशलक्ष डॉलर पेमेंटचा त्यांच्या कंपनीतील व्यापार अनियमिततेशी संबंध आहे, असा आरोप केला. तथापि, ट्रम्प कोर्टात स्तब्ध बसून राहिले. न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर पत्रकारांशी शब्दही न बोलता ते फ्लोरिडाला जाण्यासाठी विमानतळाकडे रवाना झाले. मार-ए-लाॅगो येथे समर्थकांना संबोधित करताना बायडेन प्रशासन व सरकारी वकिलांना लक्ष्य केले. २०२४ च्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ट्रम्प यांना या प्रकरणातून नवी ऊर्जा मिळाली.

या प्रकरणाचा ट्रम्प यांना तात्काळ राजकीय फायदा झाला आहे. काही सहाय्यकांनी ट्रम्प यांच्या मोहिमेसाठी अडथळा निर्माण करू शकते आणि त्यांच्या पक्षाचे प्रतिस्पर्धी, फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसॅंटिस यांच्यासाठी मार्ग सुलभ करू शकते, अशी चिंता वर्तवली होती. मात्र या प्रकरणात ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याऐवजी रिपब्लिकन विरोधकांनी त्यांचा बचाव केला. रिपब्लिकन पार्टीत ट्रम्प यांची लोकप्रियता वाढली. ट्रम्प फ्लोरिडाला परतले तेव्हा त्यांना १० मिलियन डॉलर (सुमारे ८२ कोटी रुपये) देणगीही मिळाली. त्यांचे विरोधकउटामधील रिपब्लिकन सिनेटर मिट रोमनी यांनीही अॅटर्नी ब्रॅगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मिसिसिपीच्या रिपब्लिकन सिनेटर सिंडी हाइड-स्मिथ या ट्रम्प यांना समर्थन देणाऱ्या सहाव्या सिनेटर ठरल्या आहेत. त्यांनी फिर्यादीला “राजकीय स्टंट” म्हटले.

अमेरिका नरकात जात आहे, जागतिक युद्धाचा धोका वाढला ट्रम्प म्हणाले की, बायडेन प्रशासनाकडून देश उद्ध्वस्त केला जात आहे. बायडेन प्रशासनामुळे जगाला तिसऱ्या महायुद्धाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामध्ये अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो. अनेक देश अण्वस्त्र वापरांची खुली धमकी देताहेत. त्यांच्या काळात इतर देशांना याचा साधा उल्लेखही केला नव्हता.