आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉझिटिव्ह पुढाकार:नैराश्यातून सावरण्यासाठी अमेरिकी शाळांत स्क्रीनवर सकारात्मक बातम्या

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाने मुलांमध्ये नैराश्य आणि चिंता मोठ्या प्रमाणात वाढवली. शाळा उघडल्यानंतरही मुले त्यातून सावरू शकली नाहीत. त्यामुळे अमेरिकेच्या १२० शाळांनी मुलांना सकारात्मक बातम्यांच्या मदतीने या स्थितीतून बाहेर आणण्याचा अनोखा प्रकल्प सुरू केला आहे. या शाळांमध्ये डिजिटल फलक लावले आहेत. या स्क्रीनवर परोपकाराचे काम, सकारात्मक व वैज्ञानिक संशाेधन आदी बातम्या स्क्रोल होत राहतात. गुड न्यूज नेटवर्क आणि राइज व्हिजनच्या मदतीने हा पुढाकार घेतला आहे. जीएनएनचे संस्थापक गॅरी कॉर्बले म्हणाले, या आव्हानात्मक काळात आम्ही मुले, शिक्षक, स्टाफला आशावादी करण्यात मदत करण्यासाठी रोमांचित आहोत.

बातम्या आणखी आहेत...