आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Positive Story Updates: 1 Crore Collected From Food Sales For A Cancer stricken Of Mother; News And Live Updates

आशेचा किरण:कॅन्सरग्रस्त आईच्या जग सफारीसाठी खाद्यपदार्थ विक्रीतून जमवले 1 कोटी

फिलाडेल्फिया, अमेरिका9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अपयश मर्यादित आहे, आपण ते स्वीकारले पाहिजे; पण आशा अनंत असून त्या आपण कधी सोडता कामा नये : मार्टिन ल्यूथर किंग ज्यु.

अमेरिकेतल्या फिलाडेल्फियामध्ये राहणारे डस्टिन व्हायटल सध्या खूप खुश असून या वर्षाच्या शेवटी इजिप्तमधील पिरॅमिड बघण्याची तयारी त्यांनी अातापासूनच सुरू केली अाहे. पण त्याचे कारण भावनिक अाहेे. वास्तविक, डस्टिनची आई ग्लोरियाला मूत्राशय कर्करोग असून त्यांची प्रकृती खूपच गंभीर आहे. नोकरीव्यतिरिक्त ते आईची काळजी, औषध आणि स्वयंपाक करण्यापासून ते अाईला खाऊ घालण्यापर्यंत सर्व कामे करतात. त्यांच्या अाईला मूत्राशयाचा कर्कराेग असल्याचे निदान मागील वर्षी झाले अाणि डाॅक्टरांनी सांगितले की, ती फार दिवसांची साेबती नाही. पिरॅमिड बघणे हे ग्लाेरियाचे सर्वात माेठे स्वप्न अाहे. परंतु कुटुंबाचा राेजचा खर्चच इतका अाहे की इजिप्तला जाण्याचे त्यांचे स्वप्न साकार हाेणे शक्य नव्हते. परंतु शालेय शिक्षिकेचा मुलगा डस्टिनहे स्वप्न पूर्ण करणार अाहे.

डस्टिनला आईच्या आजाराची माहिती मिळाली तेव्हा दाेघांच्याही पायाखालची वाळूच सरकली. पण डस्टिनने पुन्हा एकदा हिंमत एकवटली अाणि अाईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वत:ला झाेकून दिले. एकट्याच्या पगारात हे सर्व करणे अवघड हाेते. त्यासाठी डस्टिन अाईकडून स्वयंपाक करणे शिकला अाणि अापल्या माेहिमेला गती देण्यास सुरुवात केली. त्याने बटर, सँडविचपासून सुरुवात करत सुरुवातीला त्याची विक्री अापले मित्र अाणि नातेवाइकांना केली. त्यांच्या माध्यमातून अन्य लाेकांपर्यंत ही माहिती गेली अाणि डस्टिनकडे खाद्यपदार्थांची मागणी वाढू लागली.

अगदी काही महिन्यांतच त्याच्या घराबाहेर कार अाणि ग्राहकांच्या रांगा लागू लागल्या. परिस्थिती अशी झाली की त्याला जागा कमी पडू लागली. त्याच वेळी एका फूड ट्रकच्या मालकाने त्याला अापला ट्रक वापरण्यासाठी दिला. त्यानंतर तर डस्टिनच्या कामाने वेग घेतला. त्यानंतर त्याने अाणखी मेहनत करून ८ ते १० अाठवड्यात अापल्या कुटुंबातील १४ जणांना इजिप्तची सफर घडवण्यासाठी जवळपास १ काेटी रुपये जमवले. इतकेच नाही तर त्याने १८ हजार डाॅलरची (१३ लाख रुपये) अतिरिक्त कमाईदेखील केली. अाता ग्लाेरिया, डस्टिन अाणि त्यांच्या कुटुंबातील १२ सदस्य या वर्षाच्या अखेरपर्यंत इजिप्तला जाणार अाहेत.

बातम्या आणखी आहेत...