आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये वीज संकट:वीज बचतीसाठी 27 टक्के लोक लवकर झोपतात, 82 टक्के ब्लँकेट वापरताहेत

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमध्ये वीज संकट गडद होत आहे. यामुळे थंडीच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी दर चारपैकी एक ब्रिटिश व्यक्ती त्रस्त आहे. अनेक लोक वीज बिल कमी करण्यासाठी नवीन पद्धती शोधत आहेत. ब्रिटनमध्ये २७% लोक वेळेआधी लवकर झोपत आहेत. नुकत्याच करण्यात आलेल्या ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार, २३% लोक वाढत्या थंडीत घर उष्ण ठेवण्यासाठी खटोटोप करताना दिसत आहे. ६३% वीज आणि गॅसचा वापर करत आहेत. ९६% लोक हिटर आणि ब्लोअरसारख्या हिटिंग डिव्हाइसचा वापर केवळ गरज पडल्यावरच करत आहेत. हिवाळ्यात उष्णता मिळवण्यासाठी काय करता,असे लोकांना विचारल्यावर ८२% लोकांनी सांगितले की, जास्त कपडे आणि ब्लँकेट जमा करून त्यांचा वापर सुरू केला आहे.

दुसरीकडे, ४६% लोक हिटिंग डिव्हाइसने केवळ अशा खोल्या उष्ण करताहेत ज्यात ते राहतात. ३१% लोक मायक्रोव्हेव हीटर्स आणि गरम पाण्याच्या बाटलीचा वापर करत आहेत. ब्रिटनमध्ये ४,९६२ घरांतील सर्व्हेत समोर आले की, वीज आणि खाद्य पदार्थांच्या किमती वाढल्यामुळे दैनंदिन गरजांत कपात करत आहेत. ओएनएसच्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये महागाई १०.७% होती, ही ऑक्टोबरमध्ये ११.१% पेक्षा थोडी कमी राहिली. मात्र, अद्यापही बँक ऑफ इंग्लंडद्वारे निश्चित २% दरापेक्षा तो वर आहे.

धान्याची चिंता, १९% लोकांची डाएटमध्ये कपात हिवाळ्याच्या परिणामाबाबत अहवालानुसार, १६% लोकांना त्यांच्याकडे पैसे येईपर्यंत धान्य संपू नये,असे वाटते. १९% आहारात कपात करत आहेत. ५ पैकी १ व्यक्ती आरोग्य सेवेसाठी रुग्णालयात अपॉइंटमेंटची प्रतीक्षा करतो.

बातम्या आणखी आहेत...