आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रवासी भारतीय दिन ९ जानेवारीला आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. जगाच्या कानकोपऱ्यात राहणाऱ्या स्थलांतरित भारतीयांची संख्या ३.२ कोटींवर असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. त्यापैकी अमेरिका, युएई, सौदी अरेबिया, मलेशिया, म्यानमार, ब्रिटन, कॅनडा, श्रीलंकेत २ कोटींहून जास्त म्हणजेच ७० टक्के राहतात. अमेरिकेत ४४.५ लाख भारतीय राहतात. त्यांच्याद्वारे उत्पन्न मिळवणाऱ्या विविध देशांच्या यादीत भारत २००८ पासून अव्वल क्रमांकावर आहे. कोरोना महामारीच्या काळात म्हणजे २०२१ मध्ये परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी ८७ अब्ज (६.५ लाख कोटी रुपये) पाठवले. ही रक्कम २०२० च्या तुलनेत ४.६ टक्के जास्त आहे. त्यापैकी २० टक्के एवढा पैसा अमेरिकेतील भारतीयांना मायदेशी पाठवला. आता दरवर्षी सुमारे २५ लाख भारतीय परदेशात जात आहेत. परदेशात जाणाऱ्या कोणत्याही इतर देशांच्या तुलनेत ही संख्या देखील जास्त आहे. प्रवासी दिनाच्या निमित्ताने इंडियन डायस्पोराचे कार्यकारी संचालक संजीव जोशीपुरा यांच्याशी दैनिक भास्करने संवाद साधला. ते म्हणाले एक दशकापासून भारतीय प्रभावी भूमिका निभावतात.
आता अमेरिकन विद्यार्थ्यांशी डोळे भिडवून बोलतात भारतीय
अर्थशास्त्र व आंतरराष्ट्रीय प्रकरणात अमेरिकेच्या संसद सदस्यांना सल्ला देणाऱ्या समितीचे सदस्य संजीव जोशीपुरा यांचा जन्म भारतात झाला आहे. भारत व अमेरिकेतील संबंध दृढ होत आहेत. स्थलांतरित समुदायाकडे आता भारत-अमेरिका यांच्यातील दुवा म्हणून पाहिले जात आहे. कारण या समुदायाचे महत्त्व व भूमिका लक्षात आली आहे. २०१५ पर्यंत भारतीय विद्यार्थी अमेरिकेच्या विद्यार्थ्यांसोबत डोळे भिडवून बोलू शकत नसत. परंतु आता भारतीय विद्यार्थी व आयटी व्यावसायिकांची संख्या वाढल्याने समीकरण बदलले आहे. काही अडचणी असल्या तरी बदल सकारात्मक म्हटला पाहिजे. पूर्वी भारतीय समुदाय केवळ नोकरी, व्यापार व शिक्षण एवढा मर्यादित होता. परंतु आता आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहे. भारतीयांची आता अभिनय, क्रीडा, कला-संगीत इत्यादी क्षेत्रातही भागीदारी वाढली आहे. त्याशिवाय भारतीय राजकारणातही सक्रिय आहेत. बायडेन प्रशासनात ८० टक्के पदांवर भारतवंशीय व्यक्ती आहेत. आज भारतीय-अमेरिकी असणे याचा अर्थ आंतरराष्ट्रीय पातळीवर मुख्य धारेतील अविभाज्य घटक मानला जातो. भारतीय-अमेरिकींच्या यशामुळे त्यांच्या सॉफ्टपॉवरमध्ये वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम धोरणावर होत आहे. भारतीय समुदाय केवळ देशातच नव्हे तर अमेरिकेतही परोपकारी दिसून येतात. त्यामुळे ते पहिल्यांदाच अत्यंत प्रभावशाली म्हणून उदयाला आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.