आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Precision Air Passenger Plane Crashes I Into Victoria Lake In Tanzania I  Rescue Operations Underway I Latest News And Update  

टांझानियातील व्हिक्टोरिया तलावात विमान कोसळले:49 पैकी 23 प्रवाशांची केली सुटका; बचावकार्य सुरूच, खराब हवामानामुळे दुर्घटना

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टांझानियातील व्हिक्टोरिया तलावात रविवारी विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या विमानात 49 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून त्यापैकी 23 जणांना वाचविण्यात बचाव पथकाला यश मिळाले आहे. तर अन्य प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. यात जीवितहानी झाली की नाही, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

टांझानियातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे तलावात हे विमान तलावात कोसळले आहे. हे विमान्य वायव्य शहर बुकोबामध्ये उतरणार होते. त्याचदरम्यान, हा अपघात झाला. प्रवाशांची सुटका करण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

5 वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती

दरम्यान, या विमान अपघाताच्या घटनेनंतर यापूर्वी साधारण पाच वर्षांपूर्वी उत्तर टांझानियामध्ये अशीच विमान कोसळण्याची घटना घडली होती. त्यावेळी सफारी कंपनीचे विमान कोसळले होते. त्यात 11 जणांचा मृत्यू झाला होता.

पोलीस आणि बचाव कार्य करणारे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. आतापर्यंत विमानातील 49 पैकी केवळ 23 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर अजून उर्वरित लोकांचा शोध घेतला जात आहे.
पोलीस आणि बचाव कार्य करणारे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. आतापर्यंत विमानातील 49 पैकी केवळ 23 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर अजून उर्वरित लोकांचा शोध घेतला जात आहे.

विमानतळालगतच झाला अपघात, मोठा अनर्थ टळला
माध्यमातून मिळालेल्या वृत्तानुसार, हा अपघात टांझानियातील बुकोबा विमानतळापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर झाला. सुदैवाने नागरी वसाहतीत विमान न कोसळले मोठी दुर्घटना टळली आहे.

सदर अपघातग्रस्त विमान टांझानियामधील सर्वात मोठी खाजगी विमान कंपनी प्रिसिजन एअर कंपनीचे आहे. दरम्यान, अपघातानंतर कंपनीने निवेदन जारी करून बचाव पथकाला घटनास्थळी पाठवले आहे. पुढील दोन तासात अधिक माहिती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...