आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थंडीचा मोसम:ऑस्ट्रिया, जर्मनी, स्वित्झर्लंडमध्ये वेळेपूर्वीच थंडी; 10 इंचापर्यंत बर्फवृष्टी, तापमान उणे 2 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले

व्हिएन्ना7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बर्फवृष्टी पाहून सकाळी लोक चकित

सामान्यपणे ऑस्ट्रिया, जर्मनी, स्वित्झर्लंडमध्ये ऑक्टोबरअखेरीस थंडीचा मोसम सुरू होतो. सामान्य हिमवृष्टीने ती सुरुवात असते. परंतु यंदा तिन्ही युरोपीय देशांत वेळेच्या एक महिना आधी थंडीची चाहूल लागली आहे.

शनिवारी आल्प्स प्रदेशातील डोंगर रांगा, रहिवासी भागात सर्वत्र बर्फ आढळून येत आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार या भागात १० इंच बर्फवृष्टी झाली. तापमान उणे दोनवर गेले आहे. आतापर्यंत येथे एक महिना आधी थंडीची सुरुवात कधीही झाली नव्हती. स्वित्झर्लंडच्या हवामान विभागाने आणि जर्मनीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेटरॉलॉजीचे संशोधक म्हणाले, कोरोनाच्या काळात लोक घरात आहेत. यादरम्यान सकारात्मक बदल दिसून येत आहेत. पावसानंतर तापमानातही घट झाली आहे. त्यामुळे थंडी वेळेआधीच आली आहे.

बर्फवृष्टी पाहून सकाळी लोक चकित
आल्प्स भागात बहुतांश ठिकाणी रात्री बर्फवृष्टी झाली. सकाळी लोक उठल्यानंतर त्यांना आजूबाजूला सर्वत्र बर्फ दिसून आला. हे पाहून ते चकित झाले. बहुतांश लोक आनंदी दिसले. कारण कोरोनाच्या काळात बर्फवृष्टीने सर्वांना रोमांचित केले होते. आता आल्हाददायक वातावरणात लोक भटकंतीसाठी बाहेर पडले आहेत. काहींनी ट्रेकिंग, तर काहींनी सायकलिंग सुरू केली.

बातम्या आणखी आहेत...