आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटली:इंग्लिशवर निर्बंधाची तयारी, इटालियनमधून काम न केल्यास 90 लाखांचा दंड

रोम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटलीत सरकारी संपर्क व संवादात इंग्लिशचा वापर करण्यावर निर्बंध लावले जाणार आहेत. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या ब्रदर्स ऑफ इटली पार्टीने असे विधेयक मांडले आहे. त्याचे उल्लंघन केल्यास एक लाख युरो (सुमारे ९० लाख रुपये) एवढ्या दंडाची त्यात तरतूद आहे. सरकारी संभाषणातून काेणत्याही परदेशी भाषेच्या वापराला मनाई करण्यात आली आहे. त्यातही इंग्लिश शब्दांच्या वापराला बंदी असेल. परदेशी भाषेच्या वापरामुळे इटलीचा अपमान होत आहे. ब्रिटन आता ईयूचा भाग नाही. त्यामुळे हा निर्णय त्या अर्थाने आणखी महत्त्वाचा ठरतो. या विधेयकावर संसदेत चर्चा होईल. परदेशी कंपन्यांनाही कर्मचाऱ्यांसाठी सर्व करार-नियम इटालियन भाषेत करावे लागतील.