आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंदी भाषा:नेपाळी संसदेतून हिंदी हद्दपारीची तयारी, चीनच्या तालावर पाऊल! आपल्याच पक्षातून विरोधाला सामोरे जाणाऱ्या ओलींना विरोधी पक्षाने घेरले

काठमांडूएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कडक विरोधाला तोंड द्यावे लागेल : मधेशी नेते, इतर विरोधी नेते आक्रमक

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा आेली आता संसदेत हिंदी भाषेवर बंदी घालण्याचा विचार करत आहेत. त्यावरून नेपाळ कम्युनिस्ट पार्टीतील धुमश्चक्री व देशात सरकारच्या विरोधातील नाराजीवरून लक्ष वळवण्यासाठी आेली आता उग्र राष्ट्रवादाचा वापर करत आहेत.

काही दिवसांपूर्वी नेपाळने भारतासोबतचा सीमावाद व नागरिकत्वाच्या मुद््द्यावर कडक पवित्रा घेतल्याचे दिसून आले होते. हिंदी भाषेच्या मुद््द्यावरून जनता समाजवादी पार्टीचे खासदार व मधेशी नेते सरिता गिरी यांनी नेपाळ सरकारच्या या निर्णयावर संसदेत जोरदार विरोध दर्शवला. ते म्हणाले, सरकार तराई व मधेशी क्षेत्रात असंतोषाला आमंत्रण देत आहे. सरकारचा हा निर्णय चीनच्या तालावर घेण्यात आला आहे का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. दुसरीकडे कोरोनावरून आेली सरकारच्या विरोधात जनतेमध्ये नाराजी दिसून येते.

घेराव : विरोधी पक्षाचा चीनच्या विरोधात मोर्चा

स्वकीयांकडूनच घेरण्यात आल्यानंतर आेलींना आता विरोधकांवर हल्ले सुरू केले. नेपाळी काँग्रेसने संसदेच्या कनिष्ठ सभागृहात चीनच्या अतिक्रमणावर नियंत्रणाचा प्रस्ताव दिला. नेपाळ काँग्रेसचे खासदार देवेंद्र राज कंदेल, सत्य नारायण शर्मा खनाल व संजय कुमार गौतम यांनी हा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार चीनने विविध जिल्ह्यांतील ६४ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण केले आहे.

चिंता : कम्युनिस्ट पार्टी फुटीच्या उंबरठ्यावर

पंतप्रधान के.पी. शर्मा आेली यांचा पक्ष आता फुटीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांनी आेली यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे. प्रचंड यांनी आेली यांना इशाराही दिला आहे. पंतप्रधानांनी राजीनामा दिला नाही तर पक्षात फूट पाडू, असे त्यांनी स्पष्ट केले. आेलींनी मात्र राजीनाम्यास नकार दिला. प्रचंड यांना पक्षातून पाठिंबा मिळत आहे.

आव्हान : भारतीय भाषा बाेलणारा मोठा समुदाय

नेपाळ सरकारसाठी हिंदी भाषेवर बंदी लादणे सोपे काम राहणार नाही. नेपाळी भाषेनंतर या हिमालयीन देशात सर्वाधिक मैथिली, भोजपुरी, हिंदी बोलली जाते. नेपाळच्या तराई क्षेत्रात राहणारी मोठ्या समुदायात भारतीय भाषा बोलल्या जातात. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये हिंदीवर बंदीसाठी कायदा आणला जात असल्यास तराई क्षेत्रात त्याला कडाडून विरोध होऊ शकतो. या भागातील लोक तसेही सरकारवर नाराज आहेत.

अतिरिक्त सैन्य तैनात
उत्तराखंडजवळील नेपाळच्या सीमेवर गेल्या काही दिवसांत अचानक सैन्य पातळीवर हालचालींत वाढ झाली आहे. लिपुलेखपर्यंत रस्ते तयार होत आहेत. त्यावरून संतप्त नेपाळने छावणी व सतर्कता वाढवली. त्यामागे चीन असल्याचे म्हटले जाते. परिस्थिती लक्षात घेऊन सीमा सुरक्षा दलाने धारचुला व कालापानीमध्ये निगराणीसाठी अतिरिक्त दलास तैनात केले आहे.

बातम्या आणखी आहेत...