आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वॉशिंग्टन:नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांना बडतर्फ करण्याची तयारी

वॉशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जो बायडेन यांचा 20 जानेवारीला शपथविधी

अमेरिकेत नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीपूर्वीच मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पदच्युत करण्याची तयारी सुरू आहे. ट्रम्प यांच्याविरोधात सोमवारी डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार महाभियोग प्रस्ताव सादर करण्याची शक्यता आहे. कॅलिफोर्नियाचे खासदार टेड लियू यांनी याला पुष्टी दिली आहे. त्यांच्यानुसार, कॅपिटल हिल्सवरील हल्लाप्रकरणी महाभियोग प्रस्तावाला १८० खासदारांचा पाठिंबा आहे.

आतापर्यंत ५७ गुन्हे दाखल
संसदेवरील हल्ल्यानंतर सुरक्षा दलाला पूर्ण परिसरात नाकेबंदी करावी लागली होती. या प्रकरणात आतापर्यंत फेडरल कोर्टात (केंद्रीय न्यायालय) १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर कोलंबियाच्या जिल्हा न्यायालयात ४० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ट्रम्प समर्थकांवर अनेक आरोप आहेत.

ट्रम्प यांच्याविरोधात रिपब्लिकनचेही सदस्य
संसदेवरील हल्ल्याच्या घटनेनंतर डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांनी ट्रम्प यांना हटवण्याची तत्काळ मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातील काही सदस्यांचाही पाठिंबा आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांना व्हाइट हाऊसमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न आहेत.

महाभियोग प्रस्तावात काय? : महाभियोगासाठी चार पानांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी विश्वासघात केला आहे. त्यांनी अमेरिकेच्या सुरक्षेसाेबतच सरकारी संस्था आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेलाच धोक्यात आणले आहे.

बातम्या आणखी आहेत...