आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जो बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर गुरुवारी पहिल्यांदा परराष्ट्र धोरणावर आपली भूमिका मांडली. आपले परराष्ट्र धोरण ट्रम्प यांच्या नीतीपेक्षा जणू एकदम उलट असेल, असे संकेत त्यांनी यानिमित्ताने दिले. ‘अमेरिका इज बॅक’ अशी घोषणा त्यांनी केली. पहिल्या राजकीय संबोधनासाठी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा मंच निवडला. याप्रसंगी उपाध्यक्ष कमला हॅरिसदेखील उपस्थित होत्या. बायडेन म्हणाले, येमेनमध्ये सुरू असलेल्या युद्धासाठी अमेरिका सौदी अरेबियाला शस्त्र विक्री करणार नाही. त्याचबरोबर सहकार्यदेखील करणार नाही.
रशिया, जर्मनी, म्यानमार व चीनसंबंधी सर्व मुद्द्यांवर मत मांडले. परंतु भारताचा उल्लेख टाळला. तज्ञ या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने पाहत आहेत. जागतिक भागीदारीच्या मुद्द्यांवर बायडेन म्हणाले, अमेरिका पुन्हा जुन्या मित्रांना सोबत आणेल. त्यासाठी भागीदारी बळकट केली जाईल. जगाला पुन्हा एकजूट करण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणांवर अमेरिकेचे मित्र नाराज
माजी अ ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावरून अमेरिकेचे अनेक जुने मित्र देश नाराज आहेत. ट्रम्प यांच्या व्यापारी दरवाढीच्या धोरणामुळे अमेरिकेला युरोपीय व आशियातील नेत्यांची नाराजी आेढवून घ्यावी लागली. अनेक वेळा ट्रम्प यांनी जागतिक संघटनेच्या नियमांचे उल्लंघनही केले. अमेरिकी सैनिकांना माघारी नेण्याची धमकीही दिली. गुरुवारचे बायडेन यांचे भाषण अनेक प्रकारच्या शंकांना दूर करण्याचा प्रयत्न मानले जाते. आम्ही कूटनीतीमध्ये गुंतवणूक उगाच केलेली नाही. त्यात जगाचाही विचार आहे.
येमेन युद्धासाठी पाठिंबा बंद : येमेनमधील युद्ध सहा वर्षांपासून सुरू आहे. ते आता संपायला हवे. म्हणूनच अमेरिका साैदीच्या नेतृत्वाखालील लष्करी मोहिमांचे समर्थन आता मागे घेत आहे. मात्र जुना मित्र सौदीचा पाठिंबा सुरूच ठेवू, असे बायडेन म्हणाले.
स्थलांतरित: : बायडेन अमेरिकेत येणाऱ्या स्थलांतरितांच्या संख्येत वाढ करू इच्छितात. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेला येणाऱ्या स्थलांतरितांच्या संख्येत वेगाने घट होत होती. आता बायडेन ही संख्या वाढवून १,२५,००० करू इच्छितात.
सैन्य माघार: : बायडेन म्हणाले, जर्मनीतून अमेरिकी सैनिकांची माघार घेतली जाणार नाही. ट्रम्प यांनी जर्मनीतील ९५०० सैनिक घटवण्याची घोषणा केली होती. तेथे सुमारे ३४ हजार ५०० अमेरिकी सैनिक आहेत. संरक्षणमंत्री ऑस्टिन सैन्य तैनातीचा आढावा घेतील.
चीन व रशिया: : बायडेन म्हणाले, चीन सैन्याचा विस्तार करत आहे. जगभरात प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आर्थिक संघर्ष व मानवी हक्कावर चीनच्या विरोधात पावले उचलण्याची गरज आहे. रशियाच्या आक्रमकतेचे दिवस आता राहिलेले नाहीत. निवडणुकीतील हस्तक्षेप अमान्य आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.