आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुमत गमावले:राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी संसदेत गमावले बहुमत; 20 वर्षांत प्रथमच अशी स्थिती

फ्रान्स8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना फ्रान्सच्या संसदीय निवडणुकीत मोठा झटका बसला. ५७७ जागांच्या संसदीय निवडणुकीच्या अंतिम फेरित त्यांच्या सेंट्रिस्ट आघाडीला सर्वाधिक २४५ जागा मिळाल्या, पण बहुमतापासून ती दूर राहिली. अशा प्रकारे २ महिन्यांपूर्वीच राष्ट्रपती निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या मॅक्रॉन यांनी नॅशनल असेंब्लीत बहुमत गमावले आहे.

नवनिर्वाचित राष्ट्रपती पूर्ण बहुमत मिळवण्यात अपयशी ठरण्याची ही २० वर्षांतील पहिलीच वेळ आहे. जागांची ही संख्या फ्रान्सच्या संसदेचे सभागृह नॅशनल असेम्बलीत थेट बहुमतासाठी आवश्यक २८९ जागांपेक्षा खूप कमी आहे. जोपर्यंत मॅक्रॉन इतर पक्षांसोबत आघाडी करण्यात सक्षम होत नाहीत तोपर्यंत फ्रान्समध्ये एका कमकुवत कायदेमंडळाची शक्यता वाढली आहे. मॅक्रॉन यांच्यासाठी हा मोठा झटका आहे. कारण एप्रिलमध्ये त्यांच्याकडे नॅशनल असेम्बलीत ३०० पेक्षा जास्त जागा होत्या.

बातम्या आणखी आहेत...