आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • President Putin Compared The Sputnik Vaccine To The Rifle, Saying It Is As Reliable, Modern And Up To Date

रशिया:व्लादिमिर पुतीन यांनी रशियन रायफलसोबत केली स्पुतनिक व्हॅक्सिनची तुलना, म्हणाले- AK-47 एवढी विश्वसनीय, मॉर्डन आणि अप-टु-डेट

रशिया2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी स्पुतनिक लसची तुलना एके-47 रायफलशी केली आहे. ते म्हणाले की जगप्रसिद्ध कलाश्निकोव्ह रायफलप्रमाणेच रशियन लसही विश्वासार्ह आहे. पुतीन यांनी हे विधान परदेशातून लसीला मिळालेल्या प्रतिसादावरून केले. गुरुवारी उपपंतप्रधान तात्याना गोलिकोवा यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स मीटिंग दरम्यान पुतीन यांनी हे विधान केले.

बैठकीत राष्ट्रपती पुतीन म्हणाले, 'आमचे औषध तंत्रज्ञान कित्येक दशकांपासून वापरल्या जाणार्‍या पद्धतीवर आधारित आहे. ही लस नक्कीच आधुनिक आणि अद्ययावत आहे. लस विश्वसनीय आणि सुरक्षित आहे. हे फक्त आम्ही सांगत नाही तर युरोपियन स्पेशलिस्टसुद्धा हे सांगत आहेत. मलाही वाटते, ते बर्‍याच अंशी योग्य आहेत.'

दहा वर्षांनंतर याचे निकाल सर्वांसमोर असतील
पुतीन म्हणाले, 'लस ​​उत्पादन वाढवले जात आहे. विशेषज्ञांच्या निर्देशांच्या आधारेच याच्या वापराची शिफारस करू शकतात. याच्या उपयोग आणि निकालांच्या विश्लेषणाच्या आधारे सुमारे दहा वर्षानंतर ही समस्या सोडवली जाईल. सोबतच लाइट स्पुतनिक लससुद्धा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे.'

जगातील औषध निर्मात्यांमधील स्पर्धा उशिरा सुरु झाली
पुतीन म्हणाले, 'जगभरातील औषध उत्पादकांमधील जागतिक बाजारात स्पर्धा उशीरा झाली. आपल्याला समजून घ्यावे लागेल की, जगभरातील प्लॅटफॉर्मने अमेरिकन कंपनी फायझरच्या मॉर्डना लसीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. जगातील बाजारामध्ये ही अतिशय वेगवान प्रतिस्पर्धा करत आहे. तज्ञ, परदेशी सहयोगकर्ते आणि अमेरिकेच्या अहवालांनी त्याचे आधुनिक आणि नाविन्यपूर्ण औषध म्हणून वर्णन केले आहे. मला आशा आहे की तज्ञ कोणतीही चूक करीत नाहीत.

जगभरात स्पुतनिकचे मूल्यांकन
व्हियाना मेडिकल युनिव्हर्सिटीचे मुख्य संसर्गजन्य तज्ञ आणि ऑस्ट्रियन सोसायटी इन्फेसीज डिसीज अ‍ॅण्ड ट्रॉपिकल मेडिसिन (OEGIT) चे चेअरपर्सन फ्लोरिन थेल्हॅमर म्हणाले की, कोरोनाव्हायरस विरूद्ध लढा देण्यासाठी रशियाची स्पुतनिक लस प्रभावी आहे. यांनीही त्याची तुलना एके-47 रायफलशी केली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सांगितले. त्याचबरोबर ऑस्ट्रियानेही स्पुतनिक लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ते युरोपियन मेडिसीन एजन्सीच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.

बातम्या आणखी आहेत...