आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कॉलेजात प्रवेशासाठी पैसे देऊन आपल्या जागी दुसऱ्यालाच परीक्षा द्यायला पाठवले होते

मॅगी हाबेरमान, अॅलन फाॅयर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रम्प यांचा लहानपणी वडिलांकडून छळ व्हायचा; पुतणी मेरींचा पुस्तकात खुलासा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पुतणी मेरी ट्रम्प यांनी त्यांच्या पुस्तकात ट्रम्प यांचे वडील त्यांचा लहानपणी छळ करायचे आणि याचा त्यांच्या जीवनावर मोठा परिणाम झाल्याचा दावा केला आहे. मेरीनुसार, ट्रम्प यांच्या कुटुंबात चुकांची जबाबदारी घेणे नाही तर वाईट सवयींना प्रोत्साहन दिले जाते. स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब केला होता. त्यांनी पैसे देऊन आपल्या जागी दुसऱ्याला परीक्षा देण्यासाठी पाठवले होते. डोनाल्ड तेव्हा क्वीन्स हायस्कूलचे विद्यार्थी होते. तसेच कॉलेजमध्ये प्रवेशासाठी त्यांना चांगले गुण मिळवणे गरजेचे होते. मात्र चांगले गुण मिळवण्याबाबत त्यांना स्वत:वर अजिबात विश्वास नव्हता. यामुळे त्यांनी चुकीचा मार्ग निवडला. ट्रम्प यांच्याकडे पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्होर्टन बिझनेस स्कूलची पदवी आहे.

ट्रम्प यांचे मोठे भाऊ फ्रेड ज्युनियर यांची मुलगी मेरींच्या “टू मच अँड नेव्हर इनफ : हाऊ माय फॅमिली क्रिएटेड द वर्ल्ड््स मोस्ट डेंजरस मॅन’ या पुस्तकात डोनाल्ड ट्रम्प यांचा त्यांचे वडील फ्रेडी ट्रम्प सीनियर छळ करायचे असा दावा केला आहे. त्यांच्यानुसार, ट्रम्प सीनियर यांना प्रेमाचा अर्थच ठाऊक नव्हता. त्यांना केवळ त्यांच्या आदेशाचे पालन व्हावे असे वाटायचे. डोनाल्ड यांच्या आईची प्रकृती गंभीर होती तेव्हा ते दोन वर्षांचे होते. वडील कामात व्यग्र असायचे आणि डोनाल्डकडेही लक्ष देत नव्हते. मुलांची देखभाल करणे आपली जबाबदारी नसल्याचे त्यांना वाटायचे. ते आठवड्यातून ६ दिवस १२-१२ तास काम करायचे. याचा मोठा परिणाम डोनाल्ड यांच्या जीवनावर झाला. मोठे झाल्यावर ट्रम्प यांनीही हीच परंपरा सुरू ठेवली. दरम्यान, या पुस्तकामुळे ट्रम्प कुटुंबीय आणि व्यवसायाने मानसशास्त्रज्ञ असलेल्या मेरी यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. मेरीने २० वर्षांपूर्वी एका नॉन डिस्क्लोजर अॅग्रीमंेटवर (गुप्तता राखण्याचा करार) स्वाक्षरी केली होती. यामुळे याअंतर्गत त्या पुस्तक लिहू शकत नाहीत, असा दावा ट्रम्प कुटुंबाने केला आहे.

१४ जुलैला प्रकाशित होईल पुस्तक, बेस्ट सेलरच्या यादीत अ‌व्वल

मेरी ट्रम्प यांचे पुस्तक २८ जुलैला प्रकाशित होणार होते, मात्र आता १४ जुलैला प्रकाशित होईल. प्रकाशक सायमन अँड शूस्टरनुसार, वाढती मागणी आणि लोकांच्या स्वारस्यामुळे हे पुस्तक बेस्ट सेलरच्या यादीत पहिल्या क्रमांकांवर आले आहे. पुस्तकात राष्ट्राध्यक्षांच्या बालपणाशी संबंधित अनेक रंजक खुलासे आहेत, जे लोकांना वाचायला आवडतील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser