आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेचे संसद भवन असलेल्या कॅपिटॉल हिलवर ६ जानेवारी २०२१ ला झालेल्या हल्ल्याची सुनावणी निवड समिती करत आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समाजकंटक समर्थक उपाध्यक्ष माइक पेन्स यांच्यावर प्राणघातक हल्ल्याच्या तयारीत होते, असे तिसऱ्या दिवशी चौकशीत स्पष्ट झाले. समिती सदस्य रिपब्लिकन पॅट अॅग्युलर यांनी सांगितले की, पेन्स यांच्यापासून ४० फूट दूर असलेल्या दंगेखोरांना संधी मिळाली असती तर त्यांनी पेन्स यांना ठारच मारले असते. पेन्स यांचे वकील ग्रेग जेकब यांनी सांगितले की, पेन्स यांना कॅपिटॉल हिल सोडण्यास सांगण्यात आले होते. पण त्यांनी त्यास नकार दिला होता.
निकाल बदलण्यास नकार दिल्याने ट्रम्प म्हणाले, तुम्ही भ्याड
ट्रम्प पेन्स यांच्यावर राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल बदलण्यासाठी दबाव टाकत होते, असेही सुनावणीत स्पष्ट झाले. ट्रम्प आणि पेन्समध्ये फोनवर शाब्दिक चकमकही उडाली होती. ट्रम्प यांनी पेन्स यांना ‘डरपोक, भ्याड’ही म्हटले होते. डी-मिसचे अध्यक्ष बेनी थॉम्पसन यांनी साक्षीत सांगितले की, कुठल्याही उपाध्यक्षाने जे केले नाही ते माइक पेन्स यांनी करावे, मते रद्द ठरवावीत आणि ट्रम्प यांना विजेता घोषित करावे किंवा पुन्हा मतमोजणीसाठी ती परत करावी, अशी ट्रम्प यांची इच्छा होती. पण पेन्स यांनी दबावापुढे मान झुकवली नाही. ट्रम्प यांनी रात्री ११.२० वाजता पेन्स यांना फोन केला. तेव्हा ज्या अधिवेशनात बायडेन यांना विजेता घोषित करावयाचे होते त्याच्या अध्यक्षस्थानी पेन्स होते. पेन्स यांनी नकार दिल्याने ट्रम्प यांनी सोशल मीडियावर समर्थकांना भडकवले आणि एक तासानंतर समर्थकांनी कॅपिटॉल हिलवर हल्ला केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.