आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशियाने युक्रेनमध्ये मोठा विध्वंस घडवून आणला आहे, त्यामुळे संपूर्ण जग युक्रेनमधील परिस्थितीबद्दल चिंतेत आहे. युक्रेनचे अध्यक्ष वलोडिमिर जेलेंस्की यांनी अमेरिका आणि नाटो देशांकडून युद्धात मदतीची आशा व्यक्त केली होती, परंतु अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्यास नकार दिला आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेंस्की यांनी आपली वेदना व्यक्त केली. ते म्हणाले की, जगाने आपल्याला युद्धात लढण्यासाठी एकटे सोडले आहे.
त्यांनी सांगितले की ते कीवमध्ये आहेत आणि रशियन सैन्य तेथे दाखल झाले आहे. या रशियनांचे पहिले टार्गेट तेच स्वतः असून दुसरे टार्गेट त्यांचे कुटुंब असल्याचेही त्यांनी सांगितले.
युक्रेन स्वबळावर युद्ध लढेल - वलोडिमिर जेलेंस्की
यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेंस्की यांनी रशिया हल्ल्याच्या पहिल्या दिवशीच्या अखेरीस राष्ट्राच्या नावावर एक व्हिडिओ संबोधनात घोषणा केली की, 'आपल्याला आपल्या राज्याची संरक्षणासाठी एकटे सोडण्यात आले आहे.' युक्रेन आता रशियाशी स्वबळावर युद्ध लढणार आहे. ते म्हणाले, 'आपल्यासोबत लढायला कोण तयार आहे? मला कोणी दिसत नाही. युक्रेनला नाटो सदस्यत्वाची हमी देण्यास कोण तयार आहे? सगळे घाबरले आहेत.'
जेलेंस्की म्हणाले, 'सीमेवर तैनात युक्रेनच्या सैन्याने ज्मीनई बेटाचे रक्षण करताना आपले शौर्य दाखवले. ते शहीद झाले, परंतु त्यांनी रशियन सैन्याला शरणागती पत्करली नाही. दुर्दैवाने, आज आम्ही आमच्या 137 वीरांसह 10 लष्करी अधिकारी गमावले आहेत. या सर्वांना मरणोत्तर हिरो ऑफ युक्रेन ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. युक्रेनसाठी ज्यांनी आपले प्राण दिले त्यांना नेहमी लक्षात ठेवले जाईल.
रशियाने युक्रेनला लक्ष्य क्रमांक-1 म्हणून चिन्हित केले आहे
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, रशियन सैन्याने कीवमध्ये प्रवेश केल्यानंतर खूप विनाश आणि तोडफोड केली, परंतु त्यांनी आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.. जेलेंस्की म्हणाले, 'मी राजधानीत राहतो, माझे कुटुंब देखील युक्रेनमध्ये आहे, माझी मुले युक्रेनमध्ये आहेत. माझे कुटुंब देशद्रोही नाही, ते युक्रेनचे नागरिक आहेत. ते नेमके कुठे आहेत, हे सांगण्याचा मला अधिकार नाही. आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार, शत्रूने मला लक्ष्य क्रमांक 1, माझ्या कुटुंबाला लक्ष्य क्रमांक 2 असे मार्क केले आहे.
दुसऱ्या दिवशीही युक्रेन स्फोटांनी हैराण
दुस-या दिवशीही रशियाने युक्रेनला बॉम्बस्फोट करून हैराण केले आहे. शुक्रवारी सकाळी युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेंस्की यांनी संपूर्ण सैन्याला युद्धात उतरवण्याची घोषणा केली. युक्रेनने दावा केला आहे की त्यांच्या सैन्याने 800 हून अधिक रशियन सैनिकांना ठार केले आहे. 30 रशियन टँक आणि 7 गुप्तचर विमानेही नष्ट करण्यात आली आहेत.
युक्रेन सरकारने 18 ते 60 वयोगटातील पुरुषांना देश सोडण्यास बंदी घातली आहे. युक्रेनने आपल्या 10,000 नागरिकांना लढाईसाठी रायफल दिल्याचे काही वृत्तांत सांगितले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.