आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Presidential Contender Nikki Haley Is Proud Of Her Indian Ancestry Pakistan, A Staunch Opponent Of That China, Also Besieged Pakistan On Terrorism

राष्ट्राध्यक्षपदाच्या दावेदार निक्की हेलींना भारतीय वंशाचा अभिमान:त्या चीनच्या कट्टर विरोधक, दहशतवादावर पाकिस्तानलाही घेरले

वॉशिंग्टन | रोहित शर्मा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या निक्की हेली रिपब्लिकन पार्टीकडून दावेदार आहेत. ५१ वर्षीय निक्की साऊथ कॅरोलिनाच्या पहिल्या महिला गव्हर्नर होत्या. अमेरिकी संसदेवरील हल्ला रोखू न शकल्याने त्यांनी आपल्या पक्षाचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा विरोध केला होता. गव्हर्नर असताना त्यांनी सिरियन निर्वासितांच्या कॅरोलिनातील पुनर्वसनास विरोध केला. २०१५ मध्ये चार्लस्टन चर्च गोळीबारानंतर त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. अमेरिकेत २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी हेली म्हणाल्या की, ट्रम्प पुन्हा उभे राहणार असतील तर त्या दावा करणार नाहीत. त्यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, जर तुम्ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाबाबत बोलत असाल तर दोन प्रश्न निर्माण होतात. अशी कोणती परिस्थिती निर्माण झालीय, ज्यामुळे नव्या नेतृत्वाची गरज आहे. दुसरा, देशाला नवे नेतृत्व देऊ शकणारी व्यक्ती तुम्ही आहात का? याच्या उत्तरात त्या म्हणाल्या, होय, आता परिस्थिती बदलण्यासाठी नव्या नेतृत्वाची गरज अाहे. अशा स्थितीत अमेरिकेचे नेतृत्व मी करू शकते. निक्की नेहमीच भारत-अमेरिका संबंधाच्या पुरस्कर्त्या आहेत. त्या चीनच्या विरोधक आहेत. कोरोनाकाळात त्या म्हणाल्या होत्या की, ‘चीनने आम्हाला कोरोना महामारी दिलीय हे अमेरिकेला कळावेे, अशी मी प्रार्थना करते. तो अमेरिकेची बौद्धिक संपत्ती चोरत आहे. तो मानवाधिकारांचा शत्रू आहे. हे अमेरिकी कंपन्यांसाठी चांगले नाही.’ यामुळे त्यांना चीन सोडावा लागत आहे. त्या म्हणाल्या की, चीन भारताविरोधात पाकचा वापर करतेय. त्या दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकच्या विरोधात आहेत. अमेरिकेतील भारतीय समुदायात त्या प्रतिष्ठित आहेत. एकदा त्या म्हणाल्या होत्या, माझे पहिले नाव भारतीय आहे आणि त्याचा मला गर्व वाटतो. त्या साऊथ कॅरोलिनाच्या २००५ - ११ पर्यंत खासदार, २०११-१७ पर्यंत गव्हर्नर राहिल्या. अमेरिकेत भारतीय वंशांच्या त्या दुसऱ्या गव्हर्नर बनल्या. २०१७-१८ पर्यंत त्या संयुक्त राष्ट्रात अमेरिकी राजदूत होत्या.

निम्रता निक्की रंधावाचे आईवडील अमृतसरहून अमेरिकेत स्थायिक
निक्कींचे पूर्ण नाव निम्रता निक्की रंधावा आहे. १९९६ मध्ये रंधावाच्या जागी हेली जोडले. त्यांचे आईवडील पंजाबी शीख होते. ते अमृतसरहून अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्यांचे वडील पंजाब अॅग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीत प्राध्यापक होते. निक्कींचा जन्म अमेरिकेतच झाला. १३ वर्षांच्या असताना त्यांनी आपल्या आईच्या कपड्याच्या व्यवसायात मदत केली. त्यांनी क्लेमसन युनिव्हर्सिटीतून अकाउंटिंगमध्ये पदवी घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...