आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखे काॅल सेंटर:आत्महत्या रोखल्या, हजारोंना वैफल्यामधून बाहेर काढले

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वेळा तुम्ही मनातील अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी आपल्या आजूबाजूला समजूतदार व विश्वासू व्यक्तीचा शोध घेत असता. त्याने केवळ सहजपणे तुमचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि ते आपल्यापुरतेच ठेवावे एवढी अपेक्षा असते. अशाच लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कॅनडात एक कॉल सेंटर ‘तेल एइद माँटरियल’ याची सुरुवात झाली होती. लोक येथे आपले त्रास, तणाव याबद्दल मोकळेपणाने बोलू शकत. कॉल सेंटरचे लोक त्यांच्या समस्येवरील तोडगा थेटपणे सांगत नसत. केवळ जास्तीत जास्त वेळ देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेत. त्यानंतर त्यांना मार्ग काढण्यासाठी मदत करत. तसे तर हे कॉल सेंटर अनेक वर्षांपासून वैफल्यग्रस्त तसेच चिडचिडेपणा यामुळे पीडित असलेल्यांच्या समस्या सोडवणुकीचे काम करत आहे. परंतु कोरोनाकाळात त्याची गरज आणखी वाढली. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना याच कॉल सेंटरची मदत मिळाली. काहींनी आत्महत्या करण्याचा विचार सांगितला. काहींनी नशेच्या आहारी गेल्याचे कबूल केले. अशा लोकांना कॉल सेंटरने परावृत्त केले. हजारो लोकांना वैफल्यातून बाहेर काढले.

मदतीच्या भावनेतून कॉल सेंटरमध्ये सक्रिय या कॉल सेंटरमध्ये लोक मदतीच्या भावनेतून काम करतात किंवा इतरांच्या वेदना जाणून घेण्यात रस असलेल्यांची येथे नियुक्ती केली जाते. कामापूर्वी अशा कर्मचाऱ्याची परीक्षाही घेतली जाते.

बातम्या आणखी आहेत...