आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूझीलंड:पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांच्या लाइव्ह इंटरव्ह्यूदरम्यान आला भूकंप; व्हिडिओ व्हायरल

वेलिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जेसिंडा 2017 मध्ये न्यूजीलँडच्या पंतप्रधान बनल्या, जगभरात त्या खूप लोकप्रिय आहेत

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न सोमवारी राजधानी वेलिंग्टनमध्ये टीव्हीवर लाइव्ह इंटरव्ह्यू देत होत्या, यादरम्यान अचानक भूकंप आला. यादरम्यान त्या काहीवेळ थांबल्या, पण नंतर त्यांनी आपला इंटरव्हू शांतीपूर्णरित्या पूर्ण केला. भूकंपवर जेसिंडा यांच्या लाइव्ह रिअॅक्शनचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

ज्यादरम्यान भूकंप आला, तेव्हा जेसिंडा आर्डर्न शोच्या होस्ट रेयान ब्रिजला म्हणाल्या, ‘‘रेयान...आपण एका भूकंपाचा सामना करत आहोत. वस्तू हालत आहेत...तुम्ही पाहत असाल, तर माझ्या पाठीमागच्या वस्तुदेखील हालत आहेत. पार्लियामेंट बिल्डिंग थोडी ज्यास्त हालत आहे.’’ व्हिडिओत दिसत आहे की, यादरम्यान कॅमेरा आणि इतर वस्तुदेखील हालत होत्या. थोड्यावेळानंतर त्यांनी शोच्या होस्टला सांगितले की, त्या ठीक आहेत आणि आपला इंटरव्ह्यू सुरूच ठेवला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

5.8 रिश्टर स्केलचा भूकंप

जियोनेटनुसार, वेलिंग्टन आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रात आलेल्या भूकंपाची तीव्रता 5.8 रिश्टर स्केलची होती. याचे केंद्र वेलिंग्टनच्या जवळील गाव लेविनच्या उत्तर-पश्चिममध्ये जमिनीच्या 30 किलोमीटर आत होते.

कोणतेच नुकसान नाही

प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये आर्डर्न यांनी माहिती दिली की, भूकंपाने कोणतेही नुकसान झाले नाही. न्यूजीलँड भूकंपाच्या संक्रिय ‘रिंग ऑफ फायर’वर वसलेला आहे. प्रशांत महासागरमध्ये हा भाग 40 हजार किमीमध्ये पसरला आहे. 2011 मध्ये न्यूजीलँडच्या क्राइस्टचर्च शहरात 6.3 तीव्रतेचा भूकंप आला होता, ज्यात 185 जण मारले गेले होते. 2016 मध्ये येथील साउथ आयलँडच्या कॅकोरामध्ये 7.8 तीव्रतेचा भूकंप आला होता. यात फक्त 2 लोकांचा बळी गेला होता.

बातम्या आणखी आहेत...