आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंड:पंतप्रधान जॉन्सन रुग्णालयात; परराष्ट्रमंत्री राॅब यांच्याकडे जबाबदारी

लंडन3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • संशोधन : कोरोना विषाणूबाबतच्या आणखी एका आव्हानाचा खुलासा

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन कोरोनामुळे रुग्णालयात आहेत. २७ मार्चला बोरिस जॉन्सन यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी स्वत:ला आयसाेलेट केले होते. १० दिवसांनंतर रविवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांना ऑक्सिजन देण्यात येत आहे. आजारी असतानाही जास्त काम केल्याने प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयातूनही जॉन्सन सरकारच्या कामावर लक्ष ठेवून आहेत. आता त्यांनी परराष्ट्रमंत्री डॉमनिक राॅब यांना जबाबदारी सांभाळण्याचे सांगितले आहे. भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनाक आणि गृहमंत्री प्रीती पटेल सरकार चालवत असल्याची चर्चा सोशल मीडियावर होती. २०१९ मध्ये ४६ वर्षांचे डॉमनिक रॉब यांनी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाकडून जॉन्सन यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न रॉब नेहमीच बघायचे. त्यांनी ब्रेक्झिटला जॉन्सन यांचा धोका म्हटले होते. मात्र रॉब यांनी निवडणूक प्रचारातून माघार घेतली आणि त्यांनी जॉन्सन यांना समर्थन देणे सुरू केले. गेल्या वर्षी जुलैत जॉन्सन यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर रॉब यांना परराष्ट्र मंत्रालय सोपवण्यात अाले.

ट्रम्प म्हणाले - दोन कंपन्या व तज्ञांना जॉन्सन यांची काळजी घेण्याचे सांगितले

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, पंतप्रधान जॉन्सन यांच्यासाठी अमेरिका प्रार्थना करत आहे. ट्रम्प यांच्यानुसार त्यांनी दोन फार्मास्युटिकल कंपन्यांना बोरिस जॉन्सन यांच्या संपर्कात राहण्याविषयी सांगितले आहे. आमचे तज्ञ बोरिस यांच्या डॉक्टरांच्या संपर्कात आहेत. ते लवकर बरे होतील अशी आशा आहे. 

वारंवार नकार चौकशीच्या फेऱ्यात

जॉन्सन यांची प्रकृती बिघडत असताना १० डाउनिंग स्ट्रीट त्याचे खंडन का करत होते, याबाबत चौकशी करण्यात येत आहे. त्यांना किरकोळ संसर्ग झाल्याचे त्यांचे सहकारी सांगत होते. शुक्रवारी आयसोलेशन कालावधी संपल्यानंतर ते कार्यालयात परत येतील, असेही सांगितले जात होते. पीएमच्या निकटवर्तीयाने सांगितले की, आयसोलेशन काळात जॉन्सन व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे बैठका घेत होते, मात्र प्रकृतीत सुधारणा केली नाही. जॉन्सन यांनी म्हटले होते की, देशात दररोज १० हजार चाचण्या होतील. मंत्र्यांचे म्हणणे आहे की, अशी घोषणा करून त्यांनी सरकारला संकटात टाकले. सरकारी कर्मचाऱ्यांना सूट देण्याचीही चूक झाली.

युराेपीय देशांतील मृतांच्या संख्येत घट; ब्रिटनमध्ये २४ तासांत ८५४ जणांचा मृत्यू

युराेपीय देशांत काेराेनामुळे मृतांच्या संख्येत घट हाेत चालली असतानाच सरकारने धाेरण सैल केले आहे. आॅस्ट्रिया १४ एप्रिल पासून लाॅकडाऊन बंद करणार आहे. डेन्मार्कमध्ये १५ एप्रिल पासून शाळा व नर्सरी सुरू करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे. इटली, स्पेन व फ्रान्समध्ये रविवारी दरराेज मृतांची संख्या कमी हाेत चालली आहे. स्पेनमध्ये साेमवारी सलग चाैथ्या दिवशी मृत्यू घटले. मंगळवारी ब्रिटनमध्ये २४ तासांत ८५४ जणांचा मृत्यू झाल्याने स्थिती गंभीर झाली. एकूण मृतांचा आकडा ६ हजार २२७ वर पाेहाेचला आहे

बातम्या आणखी आहेत...