आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Prime Minister Modi In Germany, The Green Energy Agreement, A Grand Welcome From The Indian Community

मोदींंचा युरोपच्या तीन देशांचा दौरा:पंतप्रधान मोदी जर्मनीत, हरित ऊर्जेचा करार, भारतीय समुदायाकडून भव्य स्वागत

बर्लिन13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपच्या तीन देशांच्या दौऱ्यांतर्गत सोमवारी जर्मनीत दाखल झाले. यादरम्यान अनेक कार्यक्रमांत सहभागी होण्यासोबतच त्यांनी जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्याशी दोन्ही देशांदरम्यान सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी व्यापार व सांस्कृतिक संबंध मजबूत करण्यावर भर दिला. स्कोल्झ डिसेंबर २०२१ मध्ये चॅन्सलर झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रप्रमुखांची ही दुसरी भेट आहे. सहाव्या आंतर-सरकारी स्तराच्या चर्चेनंतर दोन्ही देशांत हरित आणि शाश्वत ऊर्जेच्या क्षेत्रातील भागीदारीच्या करारावरही स्वाक्षरी करण्यात आली.

भारतीय समुदायाकडून भव्य स्वागत
पंतप्रधान मोदींनी बर्लिनला पोहोचल्यानंतर भारतीय समुदायाच्या लोकांची भेट घेतली. भारतीय समुदायाने त्यांचे जोरदार स्वागत केले. देशभक्तीपर गाणे गाणाऱ्या भारतीय वंशाच्या एका मुलाचे मोदींनी कौतुक केले. मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा जर्मनीचा हा पाचवा दौरा आहे. त्यानंतर ते डेन्मार्क व फ्रान्सला जातील.

बातम्या आणखी आहेत...