आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Prime Minister Narendra Modi Congratulates New US President Joe Biden And Vice President Kamala Harris

अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांना शुभेच्छा:पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना शुभेच्छा, बायडेन अमेरिकेचे वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.

डेमोक्रेट पार्टीचे उमेदवार जो बायडेन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहे. 77 वर्षांचे बायडेन अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष बनणारे सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. यासोबतच उपराष्ट्राध्यक्ष निवड झाल्याबद्दल भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांनाही मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्विट करत म्हणाले की, 'या भव्य विजयावर मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. भारत-अमेरिका संबंधांसाठी उपराष्ट्राध्यक्ष म्हणून तुम्ही यापूर्वी दिलेले योगदान कौतुकास्पद राहिले आहे. आता तुम्ही राष्ट्राध्यक्ष झाल्याने भारत-अमेरिका संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर काम करण्यात आनंदच आहे', असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याविषयी अजून एक ट्विट केले आहे
पंतप्रधान मोदींनी अजुन एक ट्विट केले आहे. त्यांनी उपराष्ट्राध्यक्ष बनलेल्या कमला हॅरीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांचे अभिनंदनही केले आहे. मोदी म्हणाले की, 'तुमचे हे यश अतिशय प्रेरणादायी आहे. हा केवळ आपल्या नातेवाईकांसाठी नाही तर सर्व भारतीय-अमेरिकेच्या जनतेसाठी अभिमानाचा क्षण आहे. मला आशा आहे की भारत-अमेरिका संबंध तुमच्या नेतृत्वात आणि सहकार्याने नवीन उंची गाठेल', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...