आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटीश राजकुमार प्रिन्स हॅरी व त्यांच्या पत्नी मेघन मर्केल पुन्हा एकदा चर्चेत आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हॅरी यांनी गुरुवारी जारी आपल्या नव्या माहितीपटात ब्रिटीश रॉयल्सवर नवे गंभीर आरोप केलेत. "प्रिन्स विल्यमच्या सहकाऱ्यांनी माध्यमांत माझ्या व माझ्या पत्नीविषयी नकारात्मक बातम्या पेरल्या. या बातम्यांमुळे मेघनचा गर्भपात झाला," असे ते म्हणालेत.
हॅरी म्हणाला की, "मी माझ्या भविष्याविषयी जेव्हा कुटुंबीयांपुढे चर्चा करत होतो, तेव्हा माझा मोठा भाऊ प्रिन्स विल्यम माझ्यावर अत्यंत वाईट पद्धतीने ओरडला. त्यावर माझे वडील अशा गोष्टी करू लागले, ज्या अवास्तव होत्या. माझी आजीही हे सर्वकाही शांतपणे पाहत होती."
"राजघराण्याच्या कम्युनिकेशन टीमला एखादी बातमी माध्यमांत छापण्यापासून रोखायची असेल, तर त्याऐवजी ते राजघराण्याची दुसरी एखादी खमंग बातमी माध्यमांना देतात. हा एक अत्यंत वाईट खेळ आहे," असे हॅरी म्हणाले.
प्रिन्स हॅरी म्हणाले - "मी व विल्यमने पाहिले होते की, आमचे वडील किंग चार्ल्सच्या कार्यालयासोबत काय झाले होते? माझी आई राजकुमारी डायना व किंग चार्ल्स यांचा विवाह माध्यमांमुळेच मोडला होता. त्यामुळे आम्ही त्याची केव्हाही पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेत होतो. यावर आम्हा दोघांचेही मतैक्य होते."
हॅरी म्हणाले की, "या खेळात सहभागी होण्याऐवजी माझा तो संपवण्यावर भर असेल. हे अत्यंत हृदयद्रावक होते. दुसरीकडे, बकिंगहॅम पॅलेस व विल्यमचे कार्यालय केंसिंग्टन पॅलेसने हॅरीच्या डॉक्यूमेंट्रीवर भाष्य करण्यास नकार दिला आहे."
नेटफ्लिक्सवर सीरीज
नेटफ्लिक्सवर आलेल्या एका वेब सीरीजमधील ताज्यात एपिसोडमध्ये प्रिन्स हॅरीने पडद्यामागील सर्वच गोष्टी सांगितल्या आहेत. ते म्हणाले की, "प्रिन्स विल्यम त्यांच्यावर ओरडत होते. मी जे प्रस्ताव सार्वजनिक केले होते, तेच घेऊन मी सँड्रिंघमला गेलो होतो. पण तिथे पोहोचल्यानंतर माझ्यापुढे 5 पर्याय ठेवण्यात आले. मी त्यातील 3 पर्यायांची निवड केली. माझ्याकडे स्वतःचा रोजगार आहे. पण मी महाराणींनाही सहकार्य करेल असे मी म्हणालो. पण काही वेळातच तिथे बोलण्याला काहीच अर्थ नसल्याचे माझ्या लक्षात आले."
राजघराण्यातून बाहेर
प्रिन्स हॅरी व त्यांच्या पत्नी मेघन मर्केल यांनी मार्च 2020 मध्ये मनमोकळे जीवन जगण्यासाठी ब्रिटीश राजघराण्याच्या जबाबदाऱ्यांतून काढता पाय घेतला होता. त्यांच्या या निर्णयामुळे अवघे जग आश्चर्यचकित झाले होते.
एलिझाबेथ द्वितीय यांचे यंदाच झाले निधन
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचे गत 8 सप्टेंबर रोजी निधन झाले होते. तत्पूर्वी त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांचे निधन झाले. एलिझाबेथ यांना प्रिन्स चार्ल्स, राजकुमारी अॅनी, अँड्र्यू व एडवर्ड ही 4 अपत्य आहेत. या चौघांपासून त्यांना 8 नातवंडे व 12 पणतू आहेत. आता प्रिन्स विल्यम वयाच्या 40 व्या वर्षी ब्रिटीश सिंहासनाचे वारसदार झालेत. तर त्यांचे वडील प्रिन्स चार्ल्स आता राजे झालेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.