आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाेकियाे:जपानची राजकुमारी 9.10 काेटी नाकारणार! राजवंशाबाहेर विवाह करणार असल्याने मिळणारी भरपाईची रक्कम नाकारली

टाेकियाे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपानची राजकुमारी माकाे राजवंशाबाहेर एका सामान्य व्यक्तीशीविवाह करणार आहे. एवढेच नव्हे तर त्यांना शाही परिवाराकडून सुमारे ९.१० काेटी रुपये (१३.७० काेटी येन) एवढी नुकसान भरपाईदेखील मिळणार हाेती. परंतु माकाे यांनी ही भरपाई नाकारली आहे. राजकुमारी माकाेने (२९) प्रियकर काेमुराेसाेबत विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. विवाहानंतर त्यांनी अमेरिकेत स्थायिक हाेण्याची तयारी केली आहे. हा विवाह कधी हाेणार याची माहिती समाेर आलेली नाही. परंतु शाही परिवाराने या विवाहाला संमती दर्शवल्याचे सांगण्यात येते. राजकुमारी माकाे जपानचे राजे नारुहिताे यांचे बंधू राजकुमार आकिशिनाे यांची मुलगी आहे. त्यांच्या विवाहावरून यापूर्वीच वाद निर्माण झाला हाेता. तेव्हा राजकुमारी माकाे यांचे प्रियकर काेमुराे काही दिवसांसाठी अमेरिकेला गेले हाेते. तेथे ते कायद्याच्या अभ्यासासाठी गेले हाेते. वाद थंडावल्यानंतर मुलीचा विवाह व्हावा असे माकाे यांचे वडील आकिशिनाे यांनाही वाटत हाेते.

वास्तविक आता माध्यमे व साेशल मीडियातून संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया समाेर येत आहेत. अनेकांनी राजकुमारी माकाे यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. जपानची शाही परंपरा व नियमांनुसार राजपरिवारातील एखाद्या महिलेने राजवंशाबाहेर विवाह केल्यास त्यांना विशिष्ट रक्कम दिली जाते. ही रक्कम नुकसान भरपाईच्या स्वरूपात असते. त्यानंतर मुलीचा राजवंशासाेबतचे नाते वैधानिक पातळीवर संपुष्टात आल्याचे मानले जाते.

ब्रिटनच्या प्रिन्स हॅरीनेही केला राजवंशाबाहेर विवाह : ब्रिटनच्या प्रिन्स हॅरीनेदेखील २०१८ मध्ये राजवंशाबाहेर विवाह केला हाेता. अमेरिकन अभिनेत्री मेगान मर्केलसाेबतचा त्यांचा विवाह जगभरात चर्चेत आला हाेता. विवाहानंतर हॅरी व मर्केल अमेरिकेत राहत आहेत.

राजकुमारी माकाेचे भाऊ हिसाहिताे गादीचे उत्तराधिकारी
जपानी राजवंशात केवळ पुरुषच गादीचे उत्तराधिकारी हाेते. त्यामुळे राजकुमारी माकाेचे धाकटे बंधू राजकुमार हिसाहिताे (१४) या वेळी आपले वडील आकिशिनाेव्यतिरिक्त गादीचे एकमेव दावेदार आहेत. जपानच्या शाही नियमांनुसार राजवंशाबाहेर विवाह करणाऱ्या महिलांच्या मुलांना गादीचे उत्तराधिकारी मानले जात नाही.

बातम्या आणखी आहेत...