आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Prins Harry Updates: Harry Came To Say Goodbye To His Grandfather, But Was Skeptical About Attending The Funeral; News And Live Updates

कोरोनाचे परिणाम:आजोबांना निरोप देण्यासाठी आले हॅरी, मात्र अंत्यसंस्कारात सामील होण्याबाबत शंका

लंडन9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंग्लंडमध्ये कोरोनाचे नियम कडक, विशेष योजनेत दिली जाते सवलत

राजकुमार हॅरी त्यांचे आजोबा आणि ड्युक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी अमेरिकेतून इंग्लंडला आले आहेत. ९९ वर्षांचे फिलिप यांचे गेल्या शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी, १७ एप्रिलला विंडसर कॅसलच्या सेंट जॉर्ज चॅपल येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये शाही कुटुंबापासून वेगळे झाल्यानंतर हॅरी पहिल्यांदाच लंडनला आले आहेत. मात्र, ते अंत्यसंस्कारात सहभागी होतील की नाही याबाबत शंका आहे. याचे कारण म्हणजे कोरोनाचे नियम.

यात प्रवासाच्या ३ दिवस आधी चाचणी करणे व १० दिवस क्वॉरंटाइन राहावे लागते.इंग्लंडमध्ये लॉकडाऊन दरम्यान अंत्यसंस्कारात सामील होणे सोपे नाही. विशेष स्थिती किंवा लाेकांना सवलत आहे. हॅरी ‘टेस्ट टू रिलीज’ योजनेंतर्गत क्वॉरंटाइनमधून सवलत घेऊ शकतात. या योजनेत ५ दिवस क्वाॅरंटाइन राहून खासगी कोरोना चाचणी करता येते. अहवाल निगेटिव्ह आल्यास आयसोलेशन लगेच पूर्ण होईल. पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना १० दिवस क्वाॅरंटाइनमध्येच राहावे लागेल.

हॅरी यांची पत्नी मेगन गरोदर असल्याने आली नाही
हॅरी यांच्यासोबत त्यांची पत्नी मेगन मर्केल गरोदरपणामुळे प्रवास करण्यास बंदी असल्याने आलेली नाही. बकिंगहॅम पॅलेसकडून सांगण्यात आले की, मेगन डॉक्टरांच्या देखरेखीखाली कॅलिफोर्नियात राहील. दुसरीकडे, मेगन न येण्यामागे मुलाखतीवरून झालेला वादही कारण मानले जात आहे. तिने शाही कुटुंबावर भेदभावाचा आरोप केला होता.

बातम्या आणखी आहेत...