आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटन:डोअरबेलमुळे प्रायव्हसी भंग; एक कोटी दंड द्यावा लागणार, डेटा कायद्याचे उल्लंघन केल्याचे सिद्ध

लंडन12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनच्या एका व्यक्तीने आपल्या घरात कार चोरी होऊ नये यासाठी कॅमेऱ्याची डोअरबेल लावली. शेजाऱ्याने आक्षेप घेतल्यावर त्याने कोर्टात धाव घेतली. डोअरबेलमुळे डेटा कायद्याचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला १ कोटी रुपयांचा दंड द्यावा लागू शकतो. कोर्टाने इंग्लिश काउंटी ऑक्सफर्डशायरमध्ये राहणारे जॉन वुडार्ड यांना सांगितले की, डॉ. मेरी फेअरहर्स्टना दंड द्यावा लागू शकतो. न्यायालयाने वुडार्डच्या डोअरबेलला त्यांच्या शेजारच्याच्या गोपनीयतेचे उल्लंघन आणि छळ मान्य केले. ४५ वर्षीय जॉन वुडार्डनी २०१९ मध्ये कार चोरीच्या घटनेनंतर विशेष घंटी बसवली होती आणि आता ती त्यांच्यासाठी अडचण ठरली आहे. घंटीत एक कॅमेरा आणि मायक्रोफोन लावला आहे. यातून ते घराबाहेरही लक्ष ठेवू शकतात. घरी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती जमा करू शकतात. त्यांची शेजारी डाॅ. मेरी फेअरहर्स्टने या डोअरबेलला आपल्या गोपनीयतेचे उल्लंघन ठरवले. त्यांनी कोर्टाला सांगितले की, कॅमेऱ्याच्या घंटीने त्या क्षणोक्षणी वुडार्डच्या निगराणीत राहतात.

डोअरबेलवरून मोठ्या प्रमाणात दंड पहिल्यांदाच
डोअरबेलसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात कुणाला मोठा दंड ठोठावण्याचे हे ब्रिटनच्या इतिहासातील पहिले प्रकरण असण्याची शक्यता आहे. पीडित महिलेला सुमारे १.३ कोटी रुपये आरोपीला दंड म्हणून देण्याचा आदेश न्यायालय बजावण्याची शक्यता आहे. जॉन वुडार्डानी ही घंटी अॅमेझॉनवरून खरेदी केली.

बातम्या आणखी आहेत...