आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी विशेष:ट्रम्प यांच्या घरी मॅक्रॉन यांचे खासगी फोटो; एफबीआय घेऊन गेल्याने फ्रान्ससमोर पेच

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरी एफबीआयने टाकलेल्या छाप्यावरून आणखी एक नाट्य समोर आले आहे. त्यात फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांचेही नाव त्यास समाविष्ट झाले आहे. त्यांच्या बंगल्यातून जप्त केलेल्या कागदपत्रांत मॅक्रॉन यांच्या खासगी जीवनाची काही छायाचित्रे आणि दस्तऐवजही होते. ट्रम्प अध्यक्ष असताना त्यांनी स्वत:च मॅक्रॉन यांच्याबद्दलची माहिती संकलित केल्याचे जाहीर केले होते. गेल्या महिन्यात एफबीआयने ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील मार-ए-लॅगो बंगल्यावर छाप्याची कारवाई केली होती. त्यावर ‘इन्फो री : प्रेसिडेंट ऑफ फ्रान्स’ लेबल लावलेले होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार या फाइलमध्ये मॅक्रॉन यांच्या खासगी जीवनाबद्दलची कागदपत्रे आहेत. मॅक्रॉन यांच्या फाइल असल्याचे वृत्त येताच फ्रान्सच्या गुप्तचर संस्था हादरल्या आहेत. त्याबद्दल कोणत्याही परिस्थितीत अधिकची माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.

मॅक्रॉन घृणास्पद असल्याचे ट्रम्प यांचे वक्तव्य ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात मॅक्रॉन यांच्यासोबत ट्रम्प यांचे चांगले संबंध होते. दोघेही अनेक वेळा परस्परांना हस्तांदोलन करताना दिसून आले होते. परंतु २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत मॅक्रॉन यांनी अमेरिकेच्या धोरणांवर टीका केली होती. त्यानंतर उभय नेत्यांच्या संबंधात कटुता आली. एक वर्षानंतर त्यांनी नाटो आघाडीला ‘ब्रेन डेड’ असे संबोधले. त्यावर ट्रम्प यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींना अतिशय घृणास्पद व्यक्ती असे म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...