आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Priyanka Chopra In Support Of Women's Movement In Iran Protest Against Hijab Intensifies; Increased Support From Around The World

इराणमध्ये महिला आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रियंका चोप्रा:हिजाबविरोधात आंदोलन आणखी तीव्र; जगभरातून वाढला पाठिंबा

तेहराण, लंडन, न्यूयॉर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराणमध्ये हिजाबविरोधातील महिलांचे आंदोलन तिसऱ्या आठवड्यात पोहोचले आहे. २२ वर्षीय महासा अमिनीच्या मृत्यूनंतर सुरू झालेले हे आंदोलन आता जगातील अनेक देशांत तीव्र झाले आहे. अनेक देशांच्या सामान्य महिलांपासून सेलिब्रिटीजनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. भारतातून बॉलीवूड अभिनेत्री आणि युनिसेफची सद्भावना अभिनेत्री प्रियंका चोप्रानेही मार्मिक पोस्ट लिहून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, जगातील अनेक देशांत त्याच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू झाले आहे. हे आंदोलन सर्वात वेगळे यासाठी आहे कारण त्याचे नेतृत्व पूर्णपणे सामान्य महिला करत आहेत. तुर्कीमधील इस्तंबूलची एक महिला म्हणाली,‘महासाबाबत जे झाले ते आपल्याबाबतही होऊ शकते हे इराणच्या महिलांना समजले आहे.

पोलिसांकडून छळ झाला नाही, अशी महिला इराणमध्ये मिळणे कठीण आहे. असे आपल्याबाबतही घडू शकते.’

जगाचीही मिळाली साथ : हॉलीवूडचा पुढाकार प्रियंका चोप्रा (अभिनेत्री, युनिसेफची सद्भावना राजदूत): महिला आंदोलनाला पाठिंबा दिला. सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली.

अँजेलिना जोली (हॉलीवूड अभिनेत्री) : सोशल मीडियावर लिहिले,‘इराणच्या बहादूर, नीडर आणि बंडखोर महिलांचा सन्मान. महिलांना पुन्हा शिक्षित करण्याची किंवा त्यांच्या शरीराला नियंत्रित करण्याची गरज नाही.’

बेला हदीद (अमेरिकी मॉडेल): इराणी महिलांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. इंटरनेट बंदीला विरोध केला.

पद्मा लक्ष्मी (भारतीय-अमेरिकी लेखक) : महासा अमिनीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध केला. इराणी महिलांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन जगभरातील महिलांना केले. असगर फरहदी (इराणी दिग्दर्शक) : दोन वेळा ऑस्कर पटकावले. इराणी महिलांच्या समर्थनार्थ एकजूट व्हावे, असे आवाहन जगभरातील कलाकारांना व्हिडिओद्वारे केले.

तुर्की, अमेरिकेसह या देशांतही झाले आंदोलन तुर्की: इस्तंबूलमध्ये ‘महिला, आयुष्य, स्वातंत्र्य!’ अशा घोषणा. महिलांनी कात्रीने केस कापले.

वॉशिंग्टन: व्हाइट हाऊससमोर कँडल मार्च. कॅपिटॉल हिलच्या बाहेर अमिनीच्या मृत्यूचा निषेध करून प्रस्ताव मंजूर केला. लॉस एंजलिस: मेट्रो भागात इराणीबहुल लोकांनी ‘फ्री इराण’ च्या घोषणा देत निदर्शने केली.

सॅन फ्रान्सिस्को: अमिनीचे नाव आणि फोटो घेऊन निदर्शने झाली.

अफगाणिस्तान: काबूलमध्ये महिलांनी मोर्चा काढला.

पॅरिस : महिलांनी निदर्शने करत मोर्चा काढला.

युरोपीय संसदेत इराण सरकारच्या विरोधात प्रस्ताव युरोपीय संसदेने इराण सरकारच्या धोरणाचा निषेध केला आहे. आंदोलकांचा आवाज दडपणाऱ्या अधिकाऱ्यांवर निर्बंध घालावेत, अशी विनंती युरोपीय युनियनकडे केली आहे. इराणच्या विरोधात प्रस्तावही मंजूर केला आहे.

प्रियंकाने ही कलाकृतीही शेअर केली. प्रियंकाने लिहिले... अनेक वर्षांपासून दडपलेले आवाज बोलू लागतात, तेव्हा ज्वालामुखीसारखा उद्रेक होतो! ते थांबणार नाहीत अन् थांबूही नयेत. मी तुमच्या साहसामुळे चकित झाले आहे. जे इतरांना या आंदोलनात सहभागी करून घेऊ शकतील अशा सर्वांना सामावून घ्यावे. संख्या महत्त्वाची आहे. या आंदोलनाला आपला आवाज द्या. हे आवाज गप्प व्हावेत यासाठी त्यांना बाध्य केले जाणार नाही यासाठी सावध राहा आणि स्पष्ट भूमिका मांडा. मी तुमच्यासोबत आहे.

बातम्या आणखी आहेत...