आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Pro Freedom Rally In Pakistan, PoK, Pakistan's Sindh Province : Placards Of PM Modi And Other World Leaders

दिव्य मराठी विशेष:आता पाकिस्तानात ‘सिंध राष्ट्रवादा’चा नारा बुलंद; स्वातंत्र्यासाठी नागरिकांची निदर्शने, पोस्टर्सवर मोदी

कराची6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वतंत्र सिंधू देशासाठी निदर्शने; मोदी-बायडेनसह आंतरराष्ट्रीय नेत्यांचे फलक झळकवले

पाकिस्तान सरकार व तेथील लष्कराला देशातच विरोधाचा सामना करावा लागत आहे. सिंध प्रांतातील लोक आता वेगळ्या सिंधू देशाची मागणी करत आहेत. त्यासाठी रोड शो आणि निदर्शने सुरू झाली आहेत. विशेष म्हणजे या निदर्शनांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे फलक झळकवले जात आहेत. या जागतिक नेत्यांना वेगळा सिंधू देश करण्याच्या मोहिमेला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी ही निदर्शने थांबवण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा दलांनी लोकांच्या घरांवर छापे टाकून फलक जप्त केले. राजकीय कार्यकर्त्यांना घरातच थांबवण्याचे सांगण्यात आले आहे. या वेळच्या निदर्शनांचे आयोजन आधुनिक सिंधी राष्ट्रवादाचे संस्थापक समजले जाणारे जी. एम. सय्यद यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त करण्यात आले. सुरक्षा दलाच्या कठोर विरोधानंतरही लोक जी. एम. सय्यद यांची जयंती साजरी करण्यासाठी रस्त्यांवर उतरले.

निदर्शनांबाबत भारताने म्हटले आहे की, पाकिस्तानला इस्लामच्या नावावर एक देश पाहिजे होता. मात्र आजपर्यंत असे होऊ शकले नाही. पाकिस्तानात पंजाबच्या प्रभावामुळे इतर लोकांना कधीच बरोबरीचे स्थान मिळाले नाही. तेथील लोकांचा सरकारांवर विश्वास राहिलेला नाही.

पंजाबच्या प्रभावातून निघण्याचा प्रयत्न

पाकिस्तानात चार राज्य पंजाब, खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तान आणि सिंध आहेत. राज्ये चार असली तरी पाकिस्तानची सत्ता व लष्करात पंजाबचा प्रभाव आहे. एवढेच नव्हे तर पाकिस्तान क्रिकेट संघात सतत पंजाबींना संधी दिली जाते. यामुळे सिंधमधील नागरिक नाराज आहेत. त्यांना वाटते की, पाकिस्तानात त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही. तसेच सिंधू संस्कृती आणि वैदिक धर्माचे मूळ स्थानही सिंध आहे. याआधारे त्यांना पाकिस्तानातून वेगळे व्हायचे आहे. बलुचिस्तानात दीर्घकाळापासून स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरू आहे. केपीकेतील अनेक लोकांनी अत्याचाराचे आरोप देशातील सत्तेवर केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...