आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाल लैंगिक शोषण प्रकरणात कंटेटची पडताळणी करण्यात फेसबुक इतर टेक कंपन्यांच्या तुलनेत पुढे आहे. दरवर्षी कंपनी लाखो छायाचित्रे, व्हिडिआेबदद्लची माहिती देते. कंटेटमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे वय निश्चितपणे माहिती नसेल तेव्हा त्यास वयस्कर मानले जावे, अशी सूचना मेटाने मॉडरेटर्सला दिली आहे. मेटा फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर, व्हॉट्सअपची पॅरेंट कंपनी आहे. आजकाल मुले आपल्या वयाच्या मानाने जास्त प्रौढ वाटू लागली आहेत, असे अनेक अध्ययनातून समोर आलेले तथ्य आहे. काही समुदायात अल्पवयातच प्रौढत्वाची लक्षणे दिसू लागतात.
त्यामुळेच फेसबुकसाठी आक्षेपार्ह कंटेटची चाळणी करण्याचे काम करणाऱ्या एक्स्चेंजरसमोर हीच मोठी समस्या आहे. त्यांना प्रौढ व बालक यांच्यातील फरक करणे अशक्य होते. म्हणूनच हटवावे लागतील अशी लाखो छायाचित्रे बाजूला काढता येत नाहीत. कॉर्पोरेट प्रशिक्षणातील काही दस्तऐवज व मुलाखतींचे अवलोकन केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. त्यानुसार फेसबुक नक्की वय समजून घेण्यासाठी विशिष्ट पद्धतीचा वापर करते, हे त्यावरून दिसून आले. ब्रिटनमधील पेडियाट्रिशियन डॉ. जेम्स एम. टेनर यांनी या शास्त्रीय बाबीकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर फेसबुकने त्यांच्या मतांच्या आधारे पडताळणीची पद्धती विकसित केली. त्यास टेनर स्टेजेस म्हटले जाते.
भारतात तीन वर्षांत २४ लाख शोषणाची प्रकरणे
भारतात २०१७ ते २०२० दरम्यान सुमारे २४ लाख ऑनलाइन बाल अत्याचाराची प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी ८० टक्के प्रकरणात चौदा वर्षांहून कमी मुलींचा समावेश होता. एका अध्ययनानुसार देशात दररोज १ लाख १६ हजार चाइल्ड पोर्नोग्राफिक कंटेट सर्च केला जातो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.