आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत चिनी भाषेचा प्रचार-प्रसार करण्याच्या नावाखाली कम्युनिस्ट पार्टीचा अजेंडा राबवणाऱ्या चिनी संस्थांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. चिनी भाषा, संस्कृती शिकवण्यासाठी सुरू झालेल्या या संस्थांना चीनच्या कम्युनिस्ट पार्टीकडून अर्थपुरवठा केला जातो. अमेरिकन सिनेटर तसेच गृह विभागाच्या विविध तपासांतून हे निष्पन्न झाले आहे. चीनने अमेरिकेत चिनी शक्ती व प्रभाव या गोष्टींचा विस्तार केला. २००४ च्या नंतर चीन सरकारने अमेरिकेत १०० हून जास्त संस्था सुरू केल्या आहेत. यातून कम्युनिस्ट विचारांचा प्रचार केला जात होता. परंतु कारवाईनंतर अशा संस्थांची संख्या १९ एवढी राहिली आहे. चीनचे सरकार जगभरात कन्फ्युशियस संस्थांच्या माध्यमातून वार्षिक सुमारे १० अब्ज डॉलरहून जास्त खर्च करते. चीनची सरकारी संस्था हनबनच्या माध्यमातून या जगभरातील कन्फ्युशियस संस्था चालवल्या जातात. या संस्था यजमान देशातील महाविद्यालये किंवा विद्यापीठांच्या सहकार्यातून चालवली जातात. जगभरात १४६ देशांत सुमारे ५२५ संस्था आहेत. या संस्थांमध्ये ९० लाखांहून जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. या केंद्राद्वारे चिनी भाषेचे शिक्षण दिले जाते, असा दावा या संस्थेचे समर्थक करतात. परंतु मुद्दा केवळ एवढाच नाही. अनेक अमेरिकन खासदारांनी चिनी सरकारच्या शब्दांचाही हवाला दिला आहे. त्यात या केंद्रांना चीनच्या प्रचाराची शाखा असे संबोधले आहे. पॉलिट ब्यूरोचे स्थायी सदस्य ली चांगचुन म्हणाले, कन्फ्युशियस संस्था चीनच्या परदेशी प्रचाराचा एक भाग आहेत. सिनेटर टेड क्रूज, कॅलिफोर्नियातील अमेरिकन काँग्रेस महिला प्रतिनिधी डाना रोहराबाचर, सीआयए संचालक विल्यम बर्न्स, माजी परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी या कन्फ्युशियस संस्थांना बंद करण्यासाठी दीर्घकाळापासून अभियान सुरू ठेवले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने २०२० मध्ये कन्फ्युशियस संस्थांना चीनच्या परदेश मोहिमेच्या रूपाने संबोधले आहे. त्यास ‘चीन कम्युनिस्ट पार्टीचे जागतिक प्रभाव व प्रचाराचे तंत्र’ असे म्हटले आहे.
तिबेट किंवा हाँगकाँगच्या मुद्द्यावर शिक्षणास मनाई
कन्फ्युशियस संस्थांमध्ये चिनी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कम्युनिस्टने दिलेला अभ्यासक्रम शिकवला जातो. शिनजियांग, तिबेट, हाँगकाँगसारख्या मुद्द्यांवर अध्यापन करण्यास आता मनाई करण्यात आली आहे. या संस्थेने दिलेल्या धमकीनंतर द नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाने तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांचा दौरा रद्द केला होता.
संस्थांच्या आवारात कायदा चालत नाही
अमेरिकेच्या नॅशनल असोसिएशन ऑफ स्कॉलर्सने या संस्थांची तपासणी केली. कन्फ्युशियस संस्थांच्या संकेतस्थळावर अमेरिकेच्या सार्वभौमत्वावर एक प्रश्नचिन्ह लावणारा आशय दिसून येतो. कारण या संस्थांच्या आवारात केवळ कम्युनिस्टांनी दिलेले नियम लागू होतात. अमेरिकेचा कायदा चालत नाही.त्यामुळे हे एक आव्हान आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.