आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवा लागताच सर्वत्र प्रकाश पसरतो. झोपतेवेळी लाइट लावण्याची अनेकांना सवय असते. परंतु ही सवय अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देणारी ठरू शकते. प्रकाशात झोपण्याच्या सवयीमुळे हृदयविकार किंवा मधुमेहासारखा आजार जडू शकतो. त्यातून जीवनाला धाेका हाेऊ शकतो. नव्या संशाेधनानुसार प्रकाशात झोपण्याच्या सवयीमुळे हृदयाचे ठाेके वाढतात. हेच शरीरातील इन्सुलिनसोबतही घडते, असा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेतील शिकागाेमधील इलिनाॅइस विद्यापीठातील संशाेधकांनी मध्यम स्वरूपातील प्रकाश किंवा उजळलेल्या भिंतीमुळेही हृदयविकार हाेऊ शकतो. हा प्रयोग २० वृद्धांवर करण्यात आला हाेता. त्यात दहा जणांना मध्यम प्रकाश व उर्वरित दहा जणांना मंद प्रकाशात झोपायला लावले हाेते. दाेन दिवस अशाच पद्धतीने मंद आणि मध्यम प्रकाशाचा वापर करण्यात आला. या काळात वयस्करांमधील हृदयाची गती तीव्र झाल्याचे नाेंदवण्यात आले. या प्रकल्पाचे प्रमुख डाॅ. फायलिस जाे म्हणाले, तुम्ही प्रकाशामुळेच काही गाेष्टी स्पष्टपणे पाहू शकता. सातत्याने रात्रीच्या झोपेत खंड पडत असल्यास ते अनेक आजारांचे कारण ठरू शकते. त्यात स्थूलपणा आणि नैराश्यासारखे विकारही हाेण्याची शक्यता असते. त्याशिवाय या प्रयोगात प्रकाशाची प्रखरता वाढवूनदेखील प्रयोग करण्यात आला.
सौम्य पिवळा लाइट लावा
डॉ. जो यांच्या म्हणण्यानुसार ४० टक्के लोक बेड लॅम्प किंवा टीव्ही लावून झोपतात. प्रकृतीसाठी हा प्रकाश चांगला नसतो. म्हणून लोकांनी शयनकक्षात सौम्य पिवळ्या रंगाचा लाइट लावावा. कारण त्याचा प्रकाश इतरांच्या तुलनेत कमी असतो. निरोगी जीवनासाठी आठ तासांची झोप आवश्यक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.