आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझनेस स्कूल:अमेरिकेत एमबीए अभ्यासक्रमात वीस वर्षांत पहिल्यांदाच महिलांच्या प्रमाणात 39 % वाढ

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकन बिझनेस स्कूलमध्ये 2030 पर्यंत लैंगिक समानतेचे उद्दिष्ट, विक्रमी नोंद

काेराेना काळादरम्यान वर्कफाेर्समध्ये महिलांच्या संख्येत घट नाेंदवण्यात आली आहे. परंतु बिझनेस स्कूलमध्ये एमबीए अभ्यासक्रमांत महिलांच्या संख्येत यंदा ३९ टक्के वाढ झाली आहे. अमेरिकेच्या फाेर्टे फाउंडेशननुसार ५६ बिझनेस स्कूलमध्ये ४१ टक्के महिलांनी पूर्णवेळ एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार हे खूप सकारात्मक संकेत आहेत. त्यामुळे वर्कफाेर्समध्ये महिलांची भागीदारी व नेतृत्वात वाढ हाेईल. एमबीए अभ्यासक्रमात वीस वर्षांत असे पहिल्यांदाच घडून आले आहे.

महिलांच्या भागीदारीत ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिकेच्या दाेन तृतीयांश बिझनेस स्कूलमध्ये महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यापैकी १० बिझनेस स्कूलमध्ये महिलांच्या संख्येत सुमारे ४५ टक्के वाढ झाली. फाउंडेशनच्या अहवालानुसार गेल्या १० वर्षांत अमेरिकेतील काेणत्याही बिझनेस स्कूलमध्ये महिलांचे प्रमाण कधीही ४५ टक्क्यांहून जास्त राहिलेले नाही. परंतु या प्रतिष्ठित वाॅशिंग्टन स्कूल आॅफ बिझनेस व युनिव्हर्सिटी आॅफ पेनसेल्व्हेनियाच्या वाॅर्टन स्कूल व जाॅन हापकिन्स बिझनेस स्कूलमध्ये महिलांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार २०३० पर्यंत नोकरीच्या ठिकाणी लैंगिक समानता येऊ शकेल.

काेराेनाकाळात महिलांमध्ये काैशल्य विकास
फाेर्टे फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार काेराेनाकाळात अनेक क्षेत्रात महिलांना नाेकरी गमवावी लागली. या काळात अनेक महिलांनी काैशल्य विकासाचे उद्दिष्ट ठेवून एमबीए अभ्यासक्रमाची निवड केली. त्यामुळे बिझनेस स्कूलमध्ये जास्तीत जास्त प्रवेश संख्या वाढली.

बातम्या आणखी आहेत...