आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटलीच्या संसदेत इंग्रजी बॅन करण्याचा प्रस्ताव:परदेशी भाषेत सरकारी काम केल्यास 89 लाखांचा दंड, ChatGpt वरही बंदी

रोम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अँग्लोमॅनिया इटालियनचा अवमान करण्याचे काम करते, असा दावा या विधेयकात करण्यात आला आहे. - Divya Marathi
अँग्लोमॅनिया इटालियनचा अवमान करण्याचे काम करते, असा दावा या विधेयकात करण्यात आला आहे.

इटलीत लवकरच कार्यालयीन कामकाजातून इंग्रजीला हद्दपार केले जाणार आहे. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या 'ब्रदर्स ऑफ इटली पार्टी'ने संसदेत इंग्रजीसह सर्वच परदेशी भाषांविरोधात एक महत्त्वकांक्षी विधेयक मांडले आहे. हे विधेयक मंजूर झाले तर त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना 1 लाख युरोपर्यंतच्या (89 लाख 33 हजार रुपये) दंडाला सामोरे जावे लागू शकते.

CNN च्या वृत्तानुसार, परदेशी भाषांवर बंदी घालणारा कायदा फॅबियो रॅम्पेली यांनी इटलीच्या चेंबर ऑफ डेप्युटीजमध्ये (कनिष्ठ सभागृहात) सादर केला. आता त्यावर चर्चा व मतदान होईल. बिल सादर होण्याच्या एक दिवस अगोदर इटलीमध्ये ChatGpt वरही तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. सरकारने डेटा प्रायव्हसीचा हवाला देत लोकप्रिय एआय चॅटबॉटवर बंदी घातली होती.

पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या पक्षाने संसदेत इंग्रजीसह सर्व परदेशी भाषांविरोधात विधेयक मांडले आहे.
पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या पक्षाने संसदेत इंग्रजीसह सर्व परदेशी भाषांविरोधात विधेयक मांडले आहे.

अँग्लोमॅनियावर अंकुश लावण्यासाठी विधेयक

या विधेयकात सर्वच परदेशी भाषांचा उल्लेख आहे. पण त्याचे फोकस अँग्लोमॅनियावर आहे. म्हणजे ते लोक जे इंग्रजीचे समर्थक आहेत. या लोकांकडून इटालियन भाषेची अवहेलना होत असल्याचा दावा विधेयकात करण्यात आला आहे. अँग्लोमॅनिया फॅशन सारखा सदैव बदलणारा मुद्दा नाही. त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर होतो.

कंपन्यांना इटालियन भाषेत करावा लागणार करार

या विधेयकातील तरतुदींनुसार, देशातील सर्वच परदेशी संस्थांना इटालियन भाषेत नियम व रोजगार करार करणे बंधनकारक आहे. याशिवाय प्रशासकीय सेवेत असणाऱ्या व्यक्तींनाही इटालियन भाषेत वाचन व लेखन करण्यात तरबेज असणे आवश्यक आहे.

इटलीमध्ये डेटा प्रायव्हसीचा दाखला देत AI चॅटबॉट ChatGpt वरही बंदी घालण्यात आली आहे.
इटलीमध्ये डेटा प्रायव्हसीचा दाखला देत AI चॅटबॉट ChatGpt वरही बंदी घालण्यात आली आहे.

इंग्रजीत जाहिराती दाखवण्यावरही बंदी

इटलीत कार्यरत असणाऱ्या कंपन्यांना अधिकृत कामासाठी इंग्रजीचा वापर करता येणार नाही. त्यांना त्यांच्या नोकरीचे शीर्षक देखील इटालियनमध्ये लिहावे लागणार आहे. कंपनीला शॉट फॉर्ममध्येही इंग्रजी वापरता येणार नाही. विधेयातील कलम-2 नुसार देशातील सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही वस्तू किंवा सेवांच्या जाहिरातींमध्ये इंग्रजीचा वापर केला जाणार नाही.