आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीलंकेत राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून ७३व्या दिवशी आंदोलकांनी राष्ट्रपती सचिवालयाचे सर्व प्रवेशद्वार बंद केले. पोलिसांनी सोमवारी एक बौद्ध भिक्खू व चार महिलांसह २१ लोकांना अटक केली. श्रीलंकेत सध्या २.२ कोटी लोकांची कुटुंबे ७० पेक्षा जास्त वर्षांत प्रथमच सर्वात वाइट आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. श्रीलंकेत सोमवारपासून २ आठवड्यांचे शटडाऊन सुरू झाले. यासाठी शाळा, सरकारी कार्यालये, वाहतूक बंद केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने सर्व शाळा, कार्यालयांना याचे आदेश दिले आहेत. वीज संकटामुळे सर्व शाळा ऑनलाइन चालवण्याचे निर्देश दिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.