आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडनमध्ये लॉकडाऊनच्या विरोधात १० हजारांहून जास्त लोक शनिवारी निदर्शने करणार आहेत. जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रिया, बल्गेरियात, स्वित्झर्लंड, रोमानिया, सर्बिया, पोलंड, फ्रान्स व ब्रिटनमध्ये स्थानिक समस्यांवरून आंदोलने झाली. लंडनमध्ये निदर्शक व पाेलिसांसाेबत त्यांची झटापटही झाली. पाेलिसांनी ३३ जणांना अटक केली आहे. लाेकांना घरात राहण्याची सूचना करण्यात आली आहे. परंतु लाेक लाॅकडाऊनच्या निर्णयावर नाराज आहेत. आमच्या मुलांचे आयुष्य बरबाद करू नका, ही नकली महामारी आहे, अशा आशयाचे फलक घेऊन निदर्शक घाेषणा देताना दिसून आले. ब्रिटनमध्ये महामारीच्या नियमांतर्गत काेणतीही निदर्शने करणे बेकायदा आहे. या आठवड्यात लाॅकडाऊनव्यतिरिक्तही विराेधात घटनांत वाढ झाली.
कोरोनासंबंधी कडक नियमांमुळे पाेलिसांवर टीका केली जात आहे.लॉकडाऊनमध्ये २९ मार्चपर्यंत बाहेर पडून विविध प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सरकारने २१ जून पासून सर्व निर्बंध हटवण्यात यावे, अशी सूचना केली आहे. दीर्घकाळ लॉकडाऊन राहिल्याने आमच्यासमोर रोजगाराच्या समस्या निर्माण होतील, असे लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे. आम्हाला लॉकडाऊनपासून मुक्ती देण्यात यावी. लसीकरणाचा वेग, लॉकडाऊन यामुळे ब्रिटनमध्ये दोन महिन्यांत रुग्णांच्या प्रमाणात १२ टक्क्यांनी घट झाली .
ब्राझील : गेल्या आठवड्यात ५ लाखांहून जास्त रुग्ण
ब्राझीलमध्ये रविवारी गेल्या चोवीस तासांत ७३,४५० नवे रुग्ण व २३३१ जणांचा मृत्यू झाला. ब्राझीलमध्ये गेल्या आठवड्यात ५.३५ लाखांहून जास्त नवे रुग्ण आढळले. १७ हजारांहून जास्त मृत्यू झाला. नव्या रुग्णांत आणि मृतांत ब्राझील जगात सर्वात पुढे आहे. परंतु लसीकरणात ब्राझीलचा वेग कमी आहे. देशात आयसीयू खाटांच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे.
ब्रिटनमध्ये 60 हून जास्त खासदारांची निदर्शनासाठी परवानगीची मागणी
देशातील ६० खासदारांनी गृहमंत्री प्रीती पटेल यांना पत्र लिहून लाॅकडाऊन दरम्यानच्या आंदाेलनासाठी परवानगी मागितली आहे. तसेच एखाद्या आंदाेलनात सहभागी हाेणे काही गुन्हा ठरत नाही. कडक अंमलबजावणीमुळे पाेलिसांवरही टीका हाेत आहे.
युरोपात नवे रुग्ण - बहुतांश युरोपीय देशांत नव्या रुग्णांची संख्येत भर पडत आहे. फ्रान्समध्ये रविवारी ३५३४५, इटली-२३८३२, जर्मनी-१३६६५ नवे रुग्ण आढळले.
पोलंड - वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे शुक्रवारी येथे आंशिक लॉकडाऊन लागू झाले. या विरोधात वार्सामध्ये मार्च फॉर फ्रीडम सुरू झाले. चोवीस तासांत २६,४०६ नवे रुग्ण.
लसीकरण - ब्रिटनने शनिवारी विक्रमी ७ लाख ११ हजार डोस दिले. उर्वरित युरोपीय देश लसीकरणाच्या बाबतीत पिछाडीवर आहेत. ब्रिटनमध्ये ३९ टक्के लोकसंख्येला डोस दिला. युरोपात हे प्रमाण ५ टक्क्यांहून कमी आहे.
जर्मनी - सेंट्रल जर्मनीच्या कासेल शहरात २० हजारांहून जास्त लोकांनी बंदी असूनही लॉकडाऊनविरोधी निदर्शने केली. जर्मनीत दररोज सरासरी १० हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळून आले. देशात बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.