आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Protests Erupt In Canada, Police Strict On People Protesting For 22 Days Regarding Vaccine | Marathi News

कोरोना लसीच्या सक्तीला विरोध:कॅनडात निदर्शकांवर घोडदळ सोडले, 22 दिवसांत पहिल्यांदाच अशी कारवाई, 100 जण अटकेत

ओटावा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेना लसीच्या सक्तीला विराेध सुरू असलेल्या कॅनडातील आंदाेलनास दडपण्यासाठी कडक कारवाई करण्यात आली. २२ दिवसांत पहिल्यांदाच अशी कारवाई झाली. पंतप्रधान ट्रुडाे यांनी आणीबाणीची घाेषणा केल्याच्या तिसऱ्या दिवशी ट्रकचालकांच्या फ्रीडम काॅन्वाय हटवण्यासाठी सशस्त्र पाेलिसांसह घाेडेस्वार रस्त्यावर उतरले हाेते. त्यांनी १०० हून जास्त कार्यकर्त्यांना अटक केली. आंदाेलकांनी बाजूला जाण्यास नकार दिल्यामुळे दंगलविराेधी पथकाने अश्रुधुराचा मारा केला. त्यात काही आंदाेलक घाेड्याच्या पायदळी तुडवले गेले.

आंदाेलकांना अमेरिकेची मदत
कॅनडा फ्रीडम काॅन्वायला अमेरिकेतील कट्टरवादी गटातील नेते, रुढीवादी कार्यकर्त्यांचा पाठिंबा तसेच आर्थिक मदतही मिळू लागली आहे. अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत रुढीवादी राजकारणाला सक्रिय करण्याच्या उद्देशाने तसेच कॅनडाला अस्थिर करण्यासाठी हा हस्तक्षेप केला जात असल्याचे म्हटले जाते.

संसदेची मंजुरी हवी : पंतप्रधान ट्रुडाे यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. परंतु आणीबाणी लागू करण्यासाठी संसदेची मंजुरी गरजेची असते. त्याची मुदत सात दिवसांची आहे. या काळात मंजुरी न मिळाल्यास आणीबाणी लागू हाेऊ शकत नाही. त्यामुळे ट्रुडाे यांची अडचण हाेऊ शकते. सरकारला मनमानी निर्णय जनतेवर थाेपवण्याचा अधिकार नाही, असे ट्रकचालकांच्या आंदाेलनाला पाठिंबा देणाऱ्या गटांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...