आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Proven From Research Around The World; Vaccination Reduces Infection By 49%, Not Others; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लस हीच संजीवनी!:​​​​​​​जगभरातील संशोधनातून सिद्ध होतेय; लसीकरणामुळे संसर्ग 49% घटतो, इतरांनाही बाधा नाही

लंडन15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लसीच्या सिंगल डाेसनेदेखील संसर्गाचा धाेका 50 टक्के कमी

जगभरात विषाणूच्या विविध स्वरूपांवर काेराेनाची लस काम करेल किंवा नाही, याबद्दल प्रश्न उपस्थित केला जाताे. परंतु संसर्गाला राेखण्यासाठी आवश्यक उपाययाेजना करण्यासाठी संशाेधक रात्रंदिवस सक्रिय आहेत. मात्र तूर्त तरी लस घेतल्यावर संसर्गाचा वेग ४९ टक्क्यांवर येत असल्याचा दावा ब्रिटनमधील पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई) यांच्या संशाेधनातून करण्यात आला आहे. लसतज्ज्ञ डाॅ. पीटर इंग्लिश म्हणाले, लसीबाबत करण्यात आलेल्या संशाेधनाचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. लसीकरणातून हर्ड इम्युनिटी विकसित करण्यासाठीही मदत मिळू शकते, असे यातून लक्षात येते. लस घेतल्यानंतर व्यक्ती संसर्गापासून वाचते व इतरांनाही बाधित करत नाही. म्हणजेच व्यक्तीद्वारे विषाणू इतर व्यक्तीपर्यंत पाेहाेचण्याची शक्यता जवळपास नाही.

लस घेतल्यानंतर व्यक्तीला स्वत:लादेखील संसर्ग हाेण्याची शक्यता शिल्लक राहत नाही. असे असले तरी शारीरिक अंतर, मास्क व सॅनिटायझेशन इत्यादी गाेष्टींचे पालन केले पाहिजे. ब्रिटनचे आराेग्यमंत्री मॅट हॅनकाॅक म्हणाले, विषाणूपासून बचावाचा सर्वात चांगला उपाय केवळ लस आहे. लसीतून विषाणू संसर्गाची साखळीदेखील खंडित करण्यात यश मिळाले आहे. म्हणूनच लसीचे दाेन्ही डाेस घेतले पाहिजेत.

चारपैकी एका व्यक्तीला लसीनंतर डाेकेदुखी, साइड इफेक्ट शक्य
लसीकरणाबाबत लँसेटमध्ये एक संशाेधन प्रकाशित झाले. किंग्ज काॅलेज लंडनच्या संशाेधनानुसार चारपैकी एका व्यक्तीला लसीकरणानंतर डाेकेदुखी, थकवा किंवा काही सामान्य स्वरूपातील साइड इफेक्ट दिसतात. हे साइड इफेक्ट चाेवीस तासांत आपाेआप बरे हाेतात. ते एक किंवा दाेन दिवसांपर्यंत राहू शकतात. प्राेफेसर टिम स्पेक्टर यांच्या म्हणण्यानुसार ५० वर्षांहून जास्त वयाच्या लाेकांवर साइड इफेक्ट दिसून आले. ६२७३८३ एवढ्या लाेकांचा यात अभ्यास करण्यात आला. २५.४ टक्के लाेकांत साइड इफेक्ट नव्हते. ६६.२ टक्के लाेकांत एक किंवा त्यापेक्षा जास्त इफेक्ट दिसले.

लसीच्या सिंगल डाेसनेदेखील संसर्गाचा धाेका ५० टक्के कमी
पीएचई संशाेधनानुसार व्यक्तीने एक डाेस घेतल्यानंतरही इतरांना बाधित करण्याची शक्यता ५० टक्के घटते. ५७ हजार लाेकांवर करण्यात आलेल्या संशाेधनानंतर ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. एक डाेस घेतलेले ३८ टक्के लाेक तीन आठवड्यांनंतर बाधित झाले. लसीकरणाच्या दाेन आठवड्यांनंतर प्रत्येक वयाेगटात हा अभ्यास करण्यात आला. संशाेधनाचा संपूर्ण तपशील अद्याप जाहीर झालेला नाही. लवकरच ताेही जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. परंतु तूर्त तरी लसीबाबत संशोधकांचा आत्मविश्वास वाढलाय.

लसीसाठीचा उत्साह अनेकांचे प्राण वाचवू शकताे
छायाचित्र महाराष्ट्रातील अमरावतीचे आहे. लाेक लसीसाठी रांगेत उभे आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता असा उत्साह अनेकांचे प्राण वाचवू शकताे.

काेव्हॅक्सिन ६१७ वर प्रभावी : अँथनी फाउची
भारतात उत्पादित काेराेनाची स्वदेशी काेव्हॅक्सिन प्रचंड प्रभावी आहे. व्हाइट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डाॅ. अँथनी फाउची म्हणाले, काेविड-१९ च्या काॅन्वालॅसेंट सेरा व भारतात काेव्हॅक्सिन घेतलेल्या लाेकांबद्दलची माहिती संकलित केली जात हाेती. एका पाहणीसाठी ती हवी हाेती. त्यात ६१७ व्हेरिएंट्स प्रभावी दिसले. आम्ही दरराेज लसीबाबतचा डेटा संकलित करत आहाेत.

बातम्या आणखी आहेत...