आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Psychiatrists Advise To Stay Away From Dopamine Fast, I.e. For Screen, For 'digital Addiction'; There Are Benefits

वॉशिंग्टन:‘डिजिटल व्यसनमुक्तीसाठी’ मानसोपचार तज्ज्ञांचा डोपामाइन फास्ट, अर्थात स्क्रीनपासून दूर राहण्याचा सल्ला; होतोय लाभ

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

“अशातच एक तरुण माझ्याकडे उपचारांसाठी आला. त्याचे वय होते सुमारे २० वर्षे. चिंता, तणाव आणि अशक्तपणाची त्याची तक्रार होती. कॉलेज सोडल्यानंतर तो आई-वडिलांसोबत राहत होता. त्याच्या मनात वारंवार आत्महत्येचे विचार येत. त्याचा बहुतांश वेळ व्हिडिओ गेम खेळण्यातच जातो. अशा रुग्णांना दोन दशकांपूर्वी मी अँटिडिप्रेसेंट देत होते. पण या तरुणाला मी महिनाभर व्हिडिअो गेम आणि इतर कोणत्याही स्क्रीनपासून दूर राहण्याचा (डोपामाइन फास्ट) सल्ला दिला.’ स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या मानसोपचार तज्ज्ञ अॅना लेम्बके सांगत होत्या...

डॉ. लेम्बके यांच्यानुसार, त्यांनी आपल्या कारकीर्दीत चिंता आणि तणावग्रस्त अनेक रुग्ण पाहिले. यात निरोगी युवक चांगले कुटुंब आणि शिक्षण तसेच आर्थिक परिस्थिती चांगली असूनही अस्वस्थ आहेत. सामाजिक अव्यवस्था किंवा गरिबी ही नव्हे, तर डोपामाइनचे वाढते प्रमाण ही त्यांची समस्या आहे. मेंदूत निर्माण होणारे व न्यूरोट्रान्समीटर म्हणून काम करणारे हे रसायन आहे. आनंद आणि बक्षिसी या भावनेशी हे रसायन संबंधित आहे. आपण आनंद देणारे एखादे काम करत असू तर मेंदूत थोडे डोपामाइन स्रवते आणि बरे वाटते. हे समाधान क्षणिक टिकते. त्यानंतर काहीच कळत (हँगओव्हर) नाही. मग मेंदू पुन्हा तेच काम करण्यास प्रेरित करतो. काही वेळ वाट पाहिली तर ही भावना नष्ट पावते. परंतु, आपण असे करू शकत नाहीत. आपण आनंदासाठी नव्हे, मन रमावे म्हणून खेळत राहतो. थांबलो की व्यसनी माणसासारखा चिडचिडेपणा, झोपमोड हे दुष्परिणाम जाणवतात. डॉ लेम्बके सांगतात, “डोपामाइन फास्ट’मुळे या तरुण रुग्णामधील नैराश्य, अस्वस्थपणा कमी झाला. तो आता आठवड्यात २ दिवस, दोन तासाहून अधिक गेम खेळत नाही. त्यामुळे मेंदूतील डोपामाइनची पातळी आता संतुलित आहे.

डिजिटल व्यसनांपासून दूर राहिलात तर नक्की आनंद मिळेल
तज्ज्ञ सांगतात की, आपल्या मंेदूने लाखो वर्षांत बदल करून संतुलनाची व्यवस्था केली आहे. धोके तर तेव्हाही होतेच. आज डिजिटल व्यसनांची यादीच आहे. उदा. टेक्स्टिंग, मेसेजिंग, सर्फिंग, ऑनलाइन शाॅपिंग, गॅम्बलिंग आणि गेमिंग. ही उत्पादने नशेचे व्यसन लागावे अशाच प्रकारे तयार करण्यात आली आहेत. उत्साहाचे वातावरण, सेलिब्रिटींच्या गप्पा आणि एका क्लिकवर बक्षिसांची बरसात खेचून घेते. डॉ. लेम्बके सांगतात, सारेच गेम खेळत नाहीत; परंतु स्मार्टफोन सर्वांकडेच आहेत. फोनचा कमी वापर फारच कठीण आहे. परंतु, या सवयीवर नियंत्रण मिळवले तर डोपामाइनचे संतुलन आपण राखू शकतो. वर्तमानात वावरू शकतो. मग आनंद-सौख्य पुन्हा परतल्याचे जाणवेल.

बातम्या आणखी आहेत...