आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यरत लोकांसाठी सार्वजनिक वाहतूक मेंटल गिअर शिफ्टसारखे:गाणे ऐकणे, मित्रांना भेटल्यावर बरे वाटते

न्यूयॉर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकरी करताना सार्वजनिक वाहतूकीचा वापर करणे लाेकांना चांगले वाटत नाही. मात्र, वास्तवात त्यांच्यासाठी हे खूप चांगले आहे. ही सार्वजनिक वाहतूक तुमच्यासाठी एका गियरचे काम करते. यामुळे तुम्हाला ऑफिस मोडवरून पर्सनल मोडवरून शिफ्ट होण्यात मदत मिळते. अमेरिकेत लोकांना घरातून ऑफिसला प्रवास करताना सरासरी २६ मिनिटे लागतात. जवळपास ७.७% लोक तुमच्या दिवसाचे दोन तास रस्त्यावर घालतात. सायन्स अलर्टच्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. कोविडमध्ये रिमोर्ट वर्क पद्धतीमुळे लोकांच्या आयुष्यातून गायब झाले आहे. परिणाम लोकांचा मेंटल शिफ्ट गियर राहिला नाही. घर आणि ऑफिसची पर्सनॅलिटी एकमेकांत मिसळू लागली. सायन्स अलर्टच्या अभ्यासात ट्रॅव्हलिंगदरम्यान दोन प्रक्रियांवर जास्त लक्ष राहिले. पहिले ऑफिसच्या कामापासून अलगीकरण. दुसरे कार्यालयातील तणाव किंवा कामातून सुधारणा.

जे लोक रेल्वे किंवा बसने कार्यालयात जातात त्यांचे लक्ष स्थानकावर वेळेवर पोहोचणे व रेल्वेत चढण्या-उतरण्यावर राहते. त्यांचे सतत लक्ष एकाच गोष्टीवर राहते. यामुळे ते आपल्या प्रवासादरम्यान आराम करू शकतात. गाणे किंवा पॉडकास्ट ऐकू शकतात. पुस्तक वाचू शकतात. गाडी ड्राइव्ह करणाऱ्या लोकांना सतत रस्त्यांवर लक्ष ठेवावे लागते. त्यांना डोके शांत ठेवण्याची संधी मिळत नाही.

रिमोट वर्कर्स काम करण्याआधी, नंतर १५ मिनिटे चाला तणाव टाळण्यासाठी कार पूल करणे चांगला पर्याय.अभ्यासानुसार जे लोक घरातून काम करतात त्यांनी ऑफिस सुरू होण्याआधी आणि संपल्यानंतर १५ मिनिट चालले पाहिजे. यातून त्यांना मेंटल डिटॅचमेंटचा वेळ मिळू शकेल.

बातम्या आणखी आहेत...