आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Pulwama Attack Is A Success Of Imran Khan led Government, Pakistan Imran Khan Minister Fawad Choudhry On Pulwama Attack

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानची कबुली:पुलवामा हल्ला हे इम्रान खान यांच्या नेतृत्वातील सरकारचे यश, इम्रान सरकारमधील मंत्र्याची कबुली

इस्लामाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानने 20 महीन्यानंतर पुलवामा हल्ल्याची कबुली दिली आहे. इमरान सरकारमधील मंत्री फवाद चौधरींनी गुरुवारी संसदेत म्हटले की, पुलवामा हा पाकिस्तानचे आणि इम्रान खान यांच्या नेतृत्वातील सरकारचे मोठे यश आहे.

संसदेत फवाद पाकिस्तान मुस्लिम लीग-एन (PML-N) चे नेते अयाज सादिक यांच्या त्या वक्तव्याला उत्तर देत होते, ज्यात सादिक म्हणाले होते की, 'भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन यांना ताब्यात घेताना एका मीटिंगमध्ये परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी खूप घाबरले होते आणि आर्मी चीफ कमर जावेद बाजवा यांचे पाय कापत होते.'

मी म्हणतो, आम्ही घरात घुसून मारलं- चौधरी

फवाद चौधरी संसदेत भाषणावेळी म्हणाले की- 'सादिक म्हणत होते की, त्यांचे पाय कापत होते. मी म्हणतो की, आम्ही भारतात घुसून मारले. पुलवामामध्ये जे यश मिळाले आहे, ते इम्रान खान सरकारचे मोठे यश आहे. या यशाचे भागीदार तुम्ही-आम्ही आहोत. आम्हाला गर्व आहे या कृत्यावर.'

पुलवामा हल्ल्यात 44 जवान शहीद झाले होते

14 फेब्रुवारी 2019 ला जम्मू-काश्मीरमधील पुलवामाच्या अवंतीपुरा भागात CRPF च्या तुकडीवर हल्ला झाला होता. गोरीपुरा गावाजवळ झालेल्या हल्ल्यात 44 जवान शहीद झाले होते. दहशतवाद्यांनी 350 किलो विस्फोटकांनी भरतेली गाडी CRPF जवानांच्या बसवर आदळली होती. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली होती. हा काश्मीरमधील भारतीय जवानांवर मागील 30 वर्षातील सर्वात मोठा हल्ला होता.