आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अराजक:चीनमध्ये जीवनावश्यक सामान खरेदीचे आदेश; जोरदार खरेदी, युद्ध व लॉकडाऊनची भीती

बीजिंगएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चीनने आपल्या नागरिकांना दैनंदिन आवश्यक सामान खरेदी करून साठवणूक करण्याचे आदेश दिले आहेत. चीनमध्ये काेराेनाचे रुग्ण वाढले असतानाच सरकारने हा आदेश दिला आहे. पावसामुळे तयार भाज्यांचे नुकसान झाले आहे. या आदेशानंतर चीनमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

तांदूळ, नूडल्स, तेल व मिठासारखे पदार्थ जमवण्यासाठी नागरिक धडपडू लागले आहेत. तैवानसाेबत युद्ध हाेण्याची शक्यता असल्याने चीन सरकारने हा आदेश दिल्याचे मानले जाते. काही लाेक माेठा व कडक लाॅकडाऊन लागू हाेऊ शकताे, असा अंदाज लावला जात आहे. या गदाराेळामुळे सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र ‘द इकाॅनाॅमिक डेली’मध्ये नागरिकांनी हा आदेश गांभीर्याने घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. लॉककडाऊनसारख्या परिस्थितीत लाेकांना अडचणींना ताेंड देण्याची वेळ येऊ नये, असा त्यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात येते.

सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिले नसले तरी त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातही युद्ध होण्याची शंका असल्याने नागरिक आणखीनच हवालदिल झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...