आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेपाळचे नवे पंतप्रधान पुष्पकमल दहल 'प्रचंड' यांच्यामुळे भारतासोबतचे संबंध अधिक दृढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतलेल्या प्रचंड यांनी नेपाळी पंतप्रधानांच्या पहिल्या परदेश दौऱ्यावर भारतभेटीची परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रचंड यांचे पूर्ववर्ती पंतप्रधान शेर बहादूर देउबा आणि केपी शर्मा ओली हेही पदभार स्वीकारल्यानंतर परंपरेनुसार त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यावर भारतात आले होते.
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात प्रचंड भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. यासाठी चीनमधील 28 मार्च रोजी हेनान येथे होणाऱ्या बोआओ फोरमच्या बैठकीतून माघार घेण्याचे प्रचंड यांनी ठरवले आहे. 2008 मध्ये जेव्हा प्रचंड पहिल्यांदा नेपाळचे पंतप्रधान झाले. तेव्हा ते भारतात आले नाहीत आणि त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यावर चीनला गेले. त्यावेळी त्यांनी चीनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली होती.
पंतप्रधान प्रचंड यांनी भारताबद्दल घेतलेल्या या 'मवाळपणा'ची दोन मोठी कारणे आहेत
मंत्रिमंडळाचा विस्तार
पंतप्रधान प्रचंड यांना संसदेत फ्लोअर टेस्ट दाखवावी लागेल आणि एप्रिलमध्ये भारत दौऱ्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करावा लागेल. 275 खासदारांच्या संसदेत प्रचंड यांना नेपाळी काँग्रेसच्या 89 खासदारांसह इतर लहान पक्षांच्या 140 खासदारांचा स्पष्ट पाठिंबा आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, प्रचंड यांना फ्लोर टेस्टमध्ये सध्याच्या 140 च्या आकड्यापेक्षा जास्त पाठिंबा मिळू शकतो. तर विरोधी पक्ष केपी शर्मा ओली आणि त्यांच्या आघाडीच्या पक्षांकडे केवळ 95 खासदार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रचंड हे मंत्रिमंडळातील परराष्ट्र मंत्रीपदही नेपाळी काँग्रेसकडे सोपवणार आहेत.
नेपाळमध्ये पूजा पद्धतीसोबत भिक्खुनी शिकत आहेत मार्शल आर्ट
नेपाळमध्ये भिक्खुनींनी परंपरा आणि नियम मोडीत काढत स्वत:ला लाेकांच्या संरक्षणासाठी बळकट करण्याचा संकल्प सोडला आहे. त्या ध्यानासोबत कुंग फूसारख्या प्राचीन चिनी युद्धाचे कौशल्य शिकत आहेत. त्यांना कुंग फू भिक्खुनी म्हटले जात आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.