आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोरदार प्रत्युत्तर:112 वर्षे जुन्या मशीनगनच्या साह्याने युक्रेनचे लष्कर उडवतेय पुतीन सैन्याची दाणादाण, 1910 च्या बंदुकीचा वापर

युक्रेन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियासोबत सुरू असलेल्या युद्धात युक्रेनने आपल्या संरक्षणासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. रशियन राज्यकर्ता झारच्या काळातील मशीनगनचा वापर युक्रेनचे सैन्य करू लागले आहे. त्याचे नाव मॅक्झिम एम १९१० आहे. तिचे वजन ६८ किलो आहे. या मशीनगनला दोन चाकेही आहेत. म्हणूनच हे शस्त्र कोणत्याही वाहनाच्या मागे बांधून सहजपणे कोठेही घेऊन जाता येते. त्याचबरोबर ते कुशलतेने हाताळताही येते. युक्रेनमध्ये ही बंदूक विशेष विनंतीवरून काही तुकड्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हे शस्त्र १९१० मध्ये झारच्या सैन्यात सामील करण्यात आले होते. ही मशीनगन त्या काळातील स्वयंचलित शस्त्रांपैकी मानली जाते. अमेरिका-ब्रिटनच्या हिराम मॅक्झिमद्वारे त्याची निर्मिती करण्यात आली होती. त्याची बनावट महत्त्वाची आहे. गोळीबार केल्यानंतर पुन्हा गोळ्या आपोआप लोड करण्याची व्यवस्था त्यात आहे. ही मशीनगन दीर्घकाळ वापरता येते. १९ व्या शतकात युरोपच्या साम्राज्यवादी लष्करासाठी युद्धात हे प्रभावी शस्त्र ठरले होते. २०१२ मध्ये झालेल्या ऑडिटमध्ये युक्रेनकडे ३५ हजार एम १९१० बंदुका असल्याची माहिती समोर आली होती. या सर्व बंदुकांची निर्मिती १९२० ते १९५० दरम्यान झाली होती. फेब्रुवारीतील रशियाच्या आक्रमणानंतर काही एम १९१० बंदुका वापरात आणण्यात आल्या होत्या. सैन्याच्या संरक्षणात्मक रणनीतीमध्ये ही बंदूक प्रभावी राहिली होती. बंदुकीचा ढाचा अचूक निशाण्यासाठी प्रभावी ठरतो, असे मानले जाते.

प्रचार धोरणाला एम १९१० ने चुकीचे ठरवले
रशियन बंदूक पीकेएमपेक्षा पाचपट जास्त वजन असूनही एम-१९१० चे बॅरल खराब होत नाही. म्हणूनच ही बंदूक जवानांच्या पहिल्या पसंतीची आहे.

बातम्या आणखी आहेत...