आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Putin Launches 'hybrid War'; Biden's Tank Sales Ukrainian President Jelensky Hold Talks With Putin | Marathi News

‘युद्ध’ व्यापार:पुतीन यांनी छेडले ‘हायब्रिड वॉर’; बायडेन यांचे रणगाडे विक्री उद्योग, युक्रेनचे राष्ट्रपती जेलेन्स्की पुतीनशी करणार चर्चा

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनला सुरक्षेची ग्वाही देणारा अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो अजून कूटनीतीच्या मार्गाने प्रयत्न करत आहे. त्यातच रशियाचे राष्ट्रपती व्लादीमिर पुतीन यांनी युक्रेनविरोधात ‘हायब्रिड वॉर’ छेडले आहे. रशियाने पूर्व युक्रेनच्या लुहांस्क व डोनेस्टकमध्ये फुटीरवाद्यांना शस्त्र पुरवठा करून पडद्यामागून स्फोट घडवण्याचा सपाटाच लावला आहे. रशियाचे युक्रेनवर सायबर हल्ले देखील सुरू आहेत. प्रिवेटबँक व जेएससी बँकेच्या व्यवहारांना हॅक करण्यात आले आहे. युक्रेनच्या अर्थव्यवस्थेला कमकुवत करणे हाच पुतीन यांचा उद्देश आहे. बायडेन प्रशासनाने देखील या वातावरणात आर्थिक हितसंबंध जोपासत आहे.. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ऑस्टिन यांनी पोलंड गाठून शेजारी राष्ट्र युक्रेनला संरक्षण देण्यासाठी २५० रणगाडे विक्रीसाठी बोलणी सुरू केली आहे. त्याशिवाय अमेरिका युक्रेनच्या इतर शेजारी देशांसोबतही शस्त्र विक्रीसाठी प्रयत्नशील आहे. आता युक्रेनचे राष्ट्रपती जेलेन्स्की यांनी रशियावर आर्थिक निर्बंध लागू करण्यात होणाऱ्या विलंबामुळे स्वत:च पुतीन यांच्यांशी चर्चा करण्याचे ठरवले आहे.

चीनचा रशियाला पाठिंबा, नाटोचा विस्तार करणे योग्य नाही : मंत्री
युक्रेनसोबतच्या प्रश्नावर चीनने पुन्हा एकदा रशियाला पाठिंबा दिला. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी म्युनिच येथील बैठकीत जाहीर पाठिंबा दिला. यावेळी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिसही उपस्थित होत्या. वांग म्हणाले, अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नाटो युरोपात विस्तार करून रशियाच्या सरहद्दीपर्यंत असताना युरोपात शांतता नांदावी असे प्रयत्न होत आहेत, असे कसे म्हणता येईल?

आठ वर्षांपासून रशियाशी लढताेय, लढत राहू, जगाला आता समजले
कीव्हवर हल्ला करू असा रशियाचा इशारा मिळाल्यानंतर येथे तणावपूर्ण शांतता पसरली. कीव्हच्या इव्हाना म्हणाल्या, आम्ही गेल्या आठ वर्षांपासून लढत आहोत. पुढेही लढावे लागेल. जगाला आता ही माहिती मिळाली आहे. यारिसलोव्ह म्हणाले, युक्रेनला भलेही नाटोचे सहकार्य मिळत असले तरी हल्ला झाल्यानंतर अमेरिका आमच्या बचावाला येणार नाही, याची आम्हाला जाणीव आहे.

बेलारूसमध्ये 30 हजार रशियन सैनिक दीर्घकाळ राहणार
बेलारूसमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून युद्धसरावाच्या नावाखाली तैनात असलेल्या रशियन सैन्यांचा सध्या मुक्काम हलवण्याचा मुळीच विचार नाही. सुमारे ३० हजार रशियन सैनिक येथे तळ ठोकून आहे. युक्रेनच्या पूर्वेकडील भागात अशांततेची परिस्थिती असल्याने सध्या रशियन सैन्य या भागातून हलणार नसल्याचे रशियाच्या परराष्ट्र विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पूर्व युक्रेन भागातून रविवारी देखील हजारो लोकांनी पलायन केल्याचे चित्र पाहायला मिळाले. अलीकडच्या अशांततेला हे लोक युक्रेनला जबाबदार ठरवतात.

बातम्या आणखी आहेत...