आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना कधीच त्यांची कथित प्रेयसी एलिना कबेवासोबत बघितलेले नाही. हे दोघेही संबंध नसल्याचे सांगतात. परंतु माध्यमांत प्रसिद्ध वृत्तानुसार एलिनाचा सुंदर महाल गेल्या वर्षीच पुतीन यांच्या इस्टेटमध्ये बांधून तयार आहे. हे इस्टेट मॉस्कोपासून २५० मैलांवरील लेक वलदई येथे आहे. येथे ७० वर्षीय पुतीन यांच्या सोन्याच्या महालासोबत इतरही मोठे महाल आहेत.
रशियाची गुप्तचर न्यूज साइट द प्रोजेक्टच्या रिपोर्टनुसार, रिदम जिम्नॅस्टची ऑलिम्पिक चॅम्पियन गर्लफ्रेंड एलिना हिच्यासाठी पुतीन यांनी १२ मिलियन डॉलर्समध्ये १३ हजार स्क्वेअर फुटाचा व्हिला तयार केला आहे. पुतीन यांचे बँकर रशियन उद्योगपती युरी कोवालचक यांच्या कंपनीमार्फत सायप्रसमध्ये जमा केलेला काळा पैसा यासाठी वापरण्यात आला आहे.
एका अज्ञात व्हिसलब्लाेअरने उपलब्ध करून दिलेल्या दस्तावेजांत ही माहिती मिळाली आहे. पुतीन यांच्या मित्राच्या व्यवसायात तो कर्मचारी आहे. एलिनाचा व्हिला पुतीन यांच्या महालापासून केवळ ८०० मीटरवर आहे. यात पूर्णत: लाकडी काम असून रुबीजडित झुंबर आहेत. एका बांधकाम कामगाराने पुतीन यांच्या राजवाड्याचे फोटो लीक केले होते त्याचा आतील भाग पुतीन यांच्या सेंट पीटर्सबर्ग या गावी आणि १८ व्या शतकातील हर्मिटेज म्युझियमशी असलेली जवळीक दर्शवते. यात बनलेल्या तळघरात सोन्याच्या खुर्च्या आहेत. छताला सोन्याची पाते लटकवली असून पाहुण्यांना ती तोडण्यास सांगितली जाते.
एलिनाचे काळ्या समुद्रकिनारी सर्वात मोठे अपार्टमेंट
एलिनाला २०१४ मध्ये कोवालचकमधील कंपनी नॅशनल मीडिया ग्रुपचे प्रमुख बनवले होते. रशियात काळया समुद्राजवळील सोची शहरात तिच्याकडे पेंटहाऊस असून ते सर्वात मोठे अपार्टमेंट असल्याचे सांगितले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.